घरदेश-विदेशतोतया IAS बनून कॉन्स्टेबलला धू धू धुतला

तोतया IAS बनून कॉन्स्टेबलला धू धू धुतला

Subscribe

राजस्थानच्या भरतपूरमध्ये पोलिसांनी बनावट आयएएस अधिकारी म्हणून पोलीस एस्कॉर्टची सुविधा घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. हा व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन सर्व पोलिसांना धमकावत असे. एवढंच नव्हे तर शासकीय कर्मचार्‍यांच्या बदलीच्या नावाखाली फसवणूक देखील केली. शिवाय, पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती.

बनावट आयएएस व्यक्ती आपण परराष्ट्र मंत्रालयात तैनात असल्याचं सांगत रुबाब झाडायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती रविवारी उशिरा चिकसाना पोलीस ठाण्यात आली आणि त्याने पोलिसांना सांगितलं की, “मी सौरभ कुमार आयएएस अधिकारी आहे आणि दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयात तैनात आहे. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये मी काल एएसआय सुरेंद्रची बदली केली. त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्याने सौरभ नावाच्या या बनावट आयएएस अधिकाऱ्याला सलाम करून त्याला खुर्चीवर बसवले पण तो जबरदस्तीने पोलीस ठाण्यात जाऊ लागला. पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबल्यावर त्याने त्यांना कानाखाली मारली.

- Advertisement -

या व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. अनेक लोकांना त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी लावतो सांगत फसवणूक केली आहे. याप्रकरणावरुन यापूर्वीही अटक करण्यात आली होती. याशिवाय त्यांनी अनेकदा पोलीस अधिकाऱ्यांना फोन करत स्वत: ला आयएएस अधिकारी सांगत पोलिसांची एस्कॉर्ट सेवा घेतली. दरम्यान, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -