घरताज्या घडामोडीराणेंनी ठरवावं आम्हाला कसं सहकार्य करायचं - नाशिक पोलीस आयुक्त

राणेंनी ठरवावं आम्हाला कसं सहकार्य करायचं – नाशिक पोलीस आयुक्त

Subscribe

नारायण राणेंनी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी १७ सप्टेंबर ही तारिख देण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही १७ सप्टेंबर पर्यंत कोणताही कारवाई करणार नाही.

१७ सप्टेंबरपर्यंत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना हायकोर्टाकडून (Narayan Rane) दिलासा देण्यात आला आहे. हायकोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत.  त्यामुळे आता पोलिसांना तपासामध्ये कशाप्रकारचे सहकार्य करावे हे नारायण राणेंनी ठरवावे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey)  यांनी म्हटले आहे. या घटनेची पुनरावृत्ती होणार अशी  हमी नारायण राणेंनी दिली आहे. त्याच्या म्हणण्यावर ते ठाम आहेत. त्यामुळे आम्ही त्यात आम्ही कोणताही दखल घेण्याची गरज नाही. हायकोर्टाने १७ सप्टेंबरपर्यंत कोणतीही पोलीसी कारवाई करण्यास मनाई केल्याने शासनाच्या आदेशांची पायमल्ली होऊ नये याची काळजी घेणे आमचे कर्तव्य असल्याचे नाशिक पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

नारायण राणेंच्या वकिलांनी सादर केलेल्या याचिकेची प्रत आमच्यापर्यंत पोहचलेली नाही. त्याच्याकडून आलेल्या ऑडिओ क्लिपवरुन त्यांनी FIR ला चॅलेंज केल्याचे कळते. त्यासाठी आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहणार आहोत असे नाशिक पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्र्यांना देण्यात आलेली नोटीस कायम राहणार त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही. नारायण राणेंनी उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली आहे त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. त्यासाठी १७ सप्टेंबर ही तारिख देण्यात आलेली आहे त्यामुळे आम्ही १७ सप्टेंबर पर्यंत कोणताही कारवाई करणार नाही. नारायण राणेंनी या घटनेची पुनरावृत्ती होणार अशी हमी दिली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आमच्याकडून कोणताही कारवाई करणे योग्य होणार नाही.

उच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करणार

आम्ही काढलेला अटकेचा आदेश कायदेशीर आहे. या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही असे अशी हमी राणेंनी दिली आहे. या गुन्ह्यामध्ये गरज असताना आम्ही अटकेचे आदेश दिले होते मात्र त्यांनी या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही अशी हमी दिली त्यावेळी आम्ही आदेश मागे घेतले आणि नोटीसी कारवाई केली. मात्र उच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर पर्यंत कोणतीही पोलीसी कारवाई न करण्याचे आदेश दिल्याने आम्ही उच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करणार आहोत असे नाशिक पोलीस आयुक्तांनी म्हटले.

- Advertisement -

आपण कायद्याशी बांधले गेले आहोत

पोलीस शिवसेनेच्या दबावाखाली काम करत आहेत. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली. त्यांची जी तक्रार आहे ती त्यांनी द्यावी. त्याचा योग्य अभ्यास करुन त्यात गुन्हा निष्पन्न होत असल्यास निश्चित गुन्हा दाखल होईलृ,असे नाशिक पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. आपले कायद्याचे राज्य आहे. आपण कायद्याशी बांधले गेले आहोत. कायद्याचे पालन करण्याची आमची जबाबदारी असून यात कोणीही दोषी आढल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल,असे ते म्हणाले.


हेही वाचा – नारायण राणेंच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात, आशिष शेलारांकडून सीबीआय चौकशीची मागणी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -