घरदेश-विदेशदिल्लीत चार मजली कारखान्याला आग

दिल्लीत चार मजली कारखान्याला आग

Subscribe

दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिल्लीत एका ४ मजली कारखान्याला आग लागल्याची घटना घटली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत मोठे नुकसान झाल्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे २८ बंब आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आग विझवताना अग्निशमन दलाचे तीन जवान जखमी झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कारखान्याला आग कोणत्या कारणामुळे लागली? हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -