घरदेश-विदेशदिल्लीत आजपासून Odd-Even चा प्रयोग; १५ नोव्हेंबरपर्यंत नियम लागू

दिल्लीत आजपासून Odd-Even चा प्रयोग; १५ नोव्हेंबरपर्यंत नियम लागू

Subscribe

राजधानी दिल्लीत वायू प्रदुषणाची गंभीर समस्या लक्षात घेता केजरीवाल सरकारने सोमवारपासून ऑड-इवनची योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आज ऑड-इवनच्या नियमानुसार रस्त्यावर गाड्या धावताना दिसत आहेत.

राजधानी दिल्लीत वायू प्रदुषणाची गंभीर समस्या लक्षात घेता केजरीवाल सरकारने आज, सोमवारपासून ऑड-इवनची योजना राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आज सकाळपासूनच दिल्लीत ऑड-इवनच्या नियमानुसार रस्त्यावर गाड्या धावताना दिसत आहेत. त्याशिवाय नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जात आहे. या योजनेनुसार पहिल्या दिवशी दिल्लीत ज्या गाड्याच्या नंबर प्लेटवरील शेवटचा अंक सम संख्या असेल त्याच गाड्या रस्त्यावर धावतील.

- Advertisement -

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल, रविवारी दिल्लीकरांना या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. ही योजना १५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ४, ६, ८, १२ आणि १४ नोव्हेंबर रोजी रस्त्यांवर (०, २, ४, ६, ८) या शेवटच्या अंकांच्या गाड्या धावू शकतात. तर ५, ७, ९, ११, १३ आणि १५ नोव्हेंबरला (१, ३, ५, ७, ९) या अंकांनी नंबर प्लेटची शेटव होत असलेल्या गाड्या धावू शकतील. तसेच १० नोव्हेंबर रोजी रविवार असल्या कारणाने हा नियण लागू होणार नाही. दिल्लीतील वाहनांसह हा नियम इतर राज्यातील वाहनांनादेखील दिल्लीत लागू होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बस दरीत कोसळली; ५ जण ठार तर ४० जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -