घरताज्या घडामोडीमाजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर निवड!

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोईंची राज्यसभेवर निवड!

Subscribe

अवघ्या काही महिन्यांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई सेवेतून निवृत्त झाले होते. मात्र, आता त्यांची थेट राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रंजन गोगोईंच्या नावाची शिफारस केली होती. राज्यसभेवर १२ सदस्यांची निवड करण्याचा अधिकार देशाच्या राष्ट्रपतींना असतो. त्यातल्या एका सदस्याचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची निवड करण्यात आली आहे. सोमवारी गृहमंत्रालयाने अधिसूचना काढून यासंदर्भातली माहिती जाहीर केली.

ranjan gogoi notification

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -