घरदेश-विदेशआज रामलीला मैदानावर गर्जना रॅली, ५० हजार शेतकरी होणार सहभागी

आज रामलीला मैदानावर गर्जना रॅली, ५० हजार शेतकरी होणार सहभागी

Subscribe

Garjana Rally | वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. आजच्या दिवशी खासगी गाड्यांचा वापर न करता सार्वजनिक परिवनह वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली – भारतीय किसान संघाने आज रामलीला मैदानावर किसान गर्जना रॅलीचं आयोजन केलं आहे. यामध्ये जवळपास ५५ हजार शेतकरी आणि सामान्य वर्ग सहभागी होणार आहेत. यासाठी जवळपास ८०० बस आणि ४ हजार खासगी गाड्यांनी शेतकरी दाखल होणार आहेत. यामुळे रामलीला मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी अडकायचं नसेल तर रामलीला मैदानाजवळून न जाण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा – वैष्णोदेवी यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनो ही बातमी वाचा, नाहीतर बसेल दंड

- Advertisement -

भारतीय किसान संघाचे अध्यक्ष रतन सिंह कानीवाडा यांनी सांगितलं की, चार मागण्यांसाठी रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. पिकांचं मूल्य ठरवणे, कृषी यंत्र जीएसटीमुक्त करणे, किसान सन्मान योजना बारा हजार करणे, प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहोचवणे आदी मागण्यांसाठी गर्जना रॅली आयोजित करण्यात आली आहे.

या रॅलीला देशभरातील ५० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहे. या शेतकऱ्यांकडून आपल्या मागण्या सराकरकडे मांडण्यात येणार आहेत. यासाठी ४ हजारांवर गाड्या या ठिकाणी येऊ  शकतात. तर, अनेक ठिकाणांहून शेतकरी रामलीला मैदानावर येण्यास सुरुवात झाली आहे. तर, रविवार सायंकाळपासूनच शेतकरी रामलीला मैदानावर जमायला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा चीनसमोर झुकू नका, वस्तूंवर बहिष्कार टाका; अरविंद केजरीवालांचं जनतेला आवाहन

दिल्ली ट्रॅफिक पोलीसचे सेंट्रल रेंजचे उपायुक्त चंद्रकुमार यांनी सांगितलं की, महाराजा रणजीत सिंह मार्ग, मिंटो रोड गोलचक्कर, अजमेरी गेट, चमनलाल मार्ग, दिल्ली गेट, जेएलएन मार्ग, कमला मार्केट गोलचक्कर हमदर्द चौकतक, भावभूति आणि पहाडगंज चौक येथून वाहतूक वळवण्यात आली आहे.

वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. आजच्या दिवशी खासगी गाड्यांचा वापर न करता सार्वजनिक परिवनह वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा स्टॅम्प पेपरवर घेतलेला घटस्फोट अमान्यच; दिल्ली उच्च न्यायालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -