घरमहाराष्ट्रवऱ्हाडाच्या बसला खोपोलीत भीषण अपघात; चालाकाचा मृत्यू, २२ जण जखमी

वऱ्हाडाच्या बसला खोपोलीत भीषण अपघात; चालाकाचा मृत्यू, २२ जण जखमी

Subscribe

मागील एका महिन्यात बोरघाटात १४ अपघातात १३ जण ठार तर १२ जखमी तर २१ वाहनांचे नुकसान झाले आहे. इर्टीगा कार अपघातात ७ ठार तर २ जखमी, क्वालिस अपघातात विजय पाटील कांजूरमार्ग हे ठार झाले तर त्यांचे कुटुंबिय जखमी झाले होते.

खोपोली- लग्नाहून परतत असलेल्या बसचा आणि कंटेनरचा मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीनजिक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला असून २२ जण जखमी आहेत. तर, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, बसच्या मागील बाजूचा चक्काचूर झाला असून ज्या कंटेनरने धडक दिली त्या कंटेनरच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा – अपघाती बस चालकाचा बेदरकारपणा बेतला मुंबईतील दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर

- Advertisement -

सिंधुदुर्गहून एक बस मुंबईच्या दिशेने परतत होती. या बसमध्ये लग्नाचं वऱ्हाड होतं. ही बस शहापूर-वाशिंदजवळ परतली असता एका कंटेनरने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. ही धडक एवढी जोरदार होती की बसच्या पाठीमागच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तर, कंटेनरचा पुढचा भाग पूर्णपणे कोसळला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, बसमधील २२ प्रवासी जखमी आहेत. यापैकी ४ प्रवाशांना उपचारांसाठी एमजीएम रुग्णालयात नेलं असून एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १० ते १२ प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. तर, इतर सहा जखमींवर खोपोली नगरपालिकेच्या रुग्णलायात उपचार सुरू आहेत.

शाळेच्या बसला अपघात

- Advertisement -

पुणे द्रूतगती मार्गावर अंडा पॉइंटजवळ रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लोणावळ्यावरून मुबईकडे जाताना बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बस पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण मृत्यू झाले असून ११ जण गंभीर जखमी आहेत.बस चालकाची हयगय आणि बेदारकपणा दोन विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला असल्याचे आता स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांनी लोणावळा येथील वेट अँड जॉय वॉटर पार्कमध्ये जीवाची हौस मौज करीत लोणावळा भ्रमर करुन खंडाळा राजमाची पॉईंट येथील निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी बस चालकाने विद्यार्थ्यांना उतरले आणि आपणही सहभागी झाला. बोरघाट उतरताना पूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची तपासणी केली जात असे, त्याठिकाणी थांबून बसचा ब्रेक चेक केला मात्र कमी लागत असल्याचे सांगितले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी बस घाटातून घेऊन न जाण्याची केलेल्या विनंतीला चालक चैनू ठाकूर याने न जुमानल्याने ४८ चालकाचा बेदरकारपणा या अपघातास कारणीभूत ठरला आणि पुढील अनर्थ घडला.

महिनाभरात बोरघाटात १४ अपघातात १३ ठार
बोरघाट उतरताना मागील एका महिन्यात ३ बसला व ट्रक, रिक्षा , मोटारसायकल अशा वाहनांना अपघात झाला असून आळंदी वरुन परतणार्‍या भाविकांच्या बसच्या अपघातात १५ वारकरी जखमी झाले होते. अशा ५ घटनांमध्ये २१ जण जखमी झाले होते. ४ वर्षं पूर्वी बोरघाटातून खाजगी प्रवासी वाहतूक करणार्‍या बसला जुन्या महामार्गावरील गारमाळ रस्ता जवळ बस पलटी होऊन ८ प्रवासी ठार झाले होते. यावेळी हा मार्गावर एकेरी वाहतूक करीत नो एंट्री करण्यात आली होती. मात्र हाही प्रयोग भुलभुलय्या ठरला असल्याने रविवारी रात्री ८ वाजता घडलेली घटना म्हणजे प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे मानले जात आहे. मागील एका महिन्यात बोरघाटात १४ अपघातात १३ जण ठार तर १२ जखमी तर २१ वाहनांचे नुकसान झाले आहे. इर्टीगा कार अपघातात ७ ठार तर २ जखमी, क्वालिस अपघातात विजय पाटील कांजूरमार्ग हे ठार झाले तर त्यांचे कुटुंबिय जखमी झाले होते.

महामार्गावरील अपघातांची मालिका
साल            अपघात संख्या      मृतांची संख्या
२०१८                ३५९               ११४
२०१९                ३५३                ९२
२०२०                १६९                ६६
२०२१                २०६                ८८
२०२२                १६८                ६८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -