घरताज्या घडामोडीचीनसमोर झुकू नका, वस्तूंवर बहिष्कार टाका; अरविंद केजरीवालांचं जनतेला आवाहन

चीनसमोर झुकू नका, वस्तूंवर बहिष्कार टाका; अरविंद केजरीवालांचं जनतेला आवाहन

Subscribe

चीनला धडा शिकवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जनतेला एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसेच चीनहून केल्या जाणाऱ्या आयातीच्या मुद्दयावरून भाजपलाही घेरलं आहे. त्यांनी देशातील जनतेला चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, चीनच्या आयातीचा मुद्दा देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला वेदना देणारा आहे. गेल्या काही वर्षांपासून चीन आपल्याकडे डोळे वटारून पाहत आहे. त्यामुळे छोटे प्रमाणात युद्ध करून काही उपयोग नाही, असं केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

भारतातील लोक कट्टर देशभक्त आहेत. आम्हाला चीनचा स्वस्त माल नको आहे. आम्ही भारतात तयार झालेलाच माल खरेदी करु मग तो चीनच्या तुलनेत दुप्पट किमतीला का असेना. पण चीनहून माल आयात करणं थांबवा. देशातील जनतेलाही मला आवाहन करायचं आहे की, चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, असं केजरीवाल म्हणाले.

मागील पाच ते सात वर्षांत १२.३० लाख भारत सोडून गेले आहेत. या ठिकाणी कुणालाही काम करु दिलं जात नाही. मोठ-मोठे व्यापारी देश सोडून जात आहेत. खोट्या केसेसे दाखल करुन सर्वांना ठेच पोहोचवली जात आहे. चीनहून आयात केल्या जाणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक वस्तू भारतातही उत्पादित केल्या जाऊ शकतात, असंही केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तपदी डॉ.रवींद्र शिसवे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -