घरताज्या घडामोडी2030 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार, गौतम अदानींचं मोठं वक्तव्य

2030 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार, गौतम अदानींचं मोठं वक्तव्य

Subscribe

2030 पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचं मोठं वक्तव्य अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी केलं आहे. वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंटंट्सला संबोधित करताना त्यांनी यावर वक्तव्य केलं. भारत 2050 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. परंतु 2050 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असाही विश्वास अदानी यांनी व्यक्त केला.

भारत पुढील दशकात दर 12 ते 18 महिन्यांच्या कालावधीत त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात 1 ट्रिलियन डॉलर्स जोडण्यास सुरूवात करेल. कोरोनाचा काळ, रशिया-युक्रेनमधील युद्ध, हवामान बदलाचे आव्हान आणि महागाईत झालेली अभूतपूर्व वाढ यामुळे जागतिक नेतृत्वासमोर संकट निर्माण झाले आहे. 2050 पर्यंत भारताचे स्टॉक मार्केट कॅपिटल 45 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाणार असल्याचंही अदानी यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हवामान बदल कराराने जग बदलण्यात फारसे योगदान दिलेले नाही. COP 27 आणि त्याच्या मागील भागांनी जगाला अपेक्षित असलेला बदल घडवून आणू शकल्या नाहीत. आजच्या मल्टीपोलर जगात महासत्तेची व्याख्याच बदलली आहे. बहुस्तरीय जागतिक संकटाने महासत्तांच्या युनिपोलर किंवा बायपोलर जगाची मिथक मोडीत काढली आहेत. आजच्या जगात फक्त तोच देश महासत्ता असेल जो शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासात जगासमोरील आव्हानं सोडवण्यासाठी आपले तंत्रज्ञान सामायिक करण्यास तयार असेल, असं अदानी म्हणाले.


हेही वाचा :  सावरकरांचे नाव सोयीनुसार वापरून राजकारण करायचं.., सुषमा अंधारेंची भाजपवर टीका

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -