घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडेंगूचा उपचार सुरू असणार्‍या तरुणाचा मृत्यू; पोस्टमॉर्टममध्ये निघाला 'न्यूमोनिया'

डेंगूचा उपचार सुरू असणार्‍या तरुणाचा मृत्यू; पोस्टमॉर्टममध्ये निघाला ‘न्यूमोनिया’

Subscribe

नाशिक : सातपुर परिसरातील अवघ्या २२ वर्षाच्या युवकाचा न्यूमोनियामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात डेंगूचा उपचार सुरू होता. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात युवकाला डेंगू नव्हे तर न्यूमोनिया झाला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रतीक उर्फ सोनू विलास काळे असे मृत्यू झालेल्या २२ वर्षीय युवकाचे नाव आहे. प्रतीक त्र्यंबकेश्वर येथील संदीप फाउंडेशन शिक्षण संस्थेत एम.टेकच्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. अभ्यासात अत्यंत हुशार असलेला आणि काळे कुटुंबाचा एकुलताएक असलेल्या प्रतीकचा असा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. चुकीच्या उपचारामुळेच प्रतीकचा मृत्यू झाला का? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.

सातपूर गावातील राजवाडा परिसरात राहणाऱ्या प्रतीकची प्रकृती खालावल्यामुळे सुरवातीला सातपूर परिसरातीलच एका स्थानिक डाॅक्टरांकडे उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत कोणतीही सुधारणा न होता त्याउलट त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. मागील काही महिन्यात शहरात डेंगूच्या वाढलेल्या रुग्णांची संख्या बघता तसेच प्रतीकच्या आजारपणाची लक्षणे यावरून त्याची एनएस-१ चाचणी करण्यात आली. डेंगूचे निदान करणार्‍या एनएस-१ चाचणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने डाॅक्टरांनी प्रतिकला डेंग्यूचा निष्कर्ष काढला हाेता. आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान प्रतीकचा दुर्दैवी अंत झाला.

- Advertisement -

प्रतिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात प्रतीकला डेंगू झालेलाच नव्हता. त्याच्या शरीरात न्यूमोनियाचे वायरस आढळून आले आहेत. शवविच्छेदनातून समोर आलेल्या माहितीमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रतीकचा मृत्यू चुकीच्या इलाजामुळेच झाला का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याघटनेमुळे सातपुर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रतीकच्या पच्छात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

अभ्यासात होता हुशार

मयत प्रतीकने सुरवातीला सिव्हिल इंजिनियरिंगचा डिप्लोमा पूर्ण करून त्याने संदीप फाउंडेशन मध्येच आपले पदवीचेही शिक्षण केले. त्यानंतर पदवी उत्तर एम. टेकलाही प्रवेश घेतला होता. सध्या तो दुसऱ्या वर्षात ताे शिकत हाेता. परिसरात अत्यंत हुशार आणि सहृदयी अशी प्रतीकची ओळख होती.

- Advertisement -
शहरात डेंगूचे चालू महिन्यात नव्याने ५७८ रुग्ण

महापालिकेतर्फे १ ते १८ नाेव्हेंबर दरम्यान ३००० रुग्णांच्या डेंग्यूच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७८ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले आले आहेत. यात मृत्यूचे प्रमाण जरी शून्य असले तरी त्यामुळे धोका कमी होत नाही. एकूणच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नाशिक महानगरपालिकेच्या चाचण्यांचे प्रमाण अधिक असून पाॅझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ १० टक्केच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -