घरताज्या घडामोडीAdani Capital: अदानींच्या कंपनीचे बुरे दिन, 'या' विदेशी कंपन्या खरेदीसाठी सरसावल्या

Adani Capital: अदानींच्या कंपनीचे बुरे दिन, ‘या’ विदेशी कंपन्या खरेदीसाठी सरसावल्या

Subscribe

जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीला आता बुरे दिन आले आहेत. कारण या कंपनीचे स्टेक खरेदी करण्यासाठी तीन प्रमुख विदेशी कंपन्या पुढे सरसावले आहेत. बँक खरेदी करण्यासाठी विदेशी वित्त कंपनी बेन फंटरनर आघाडीवर असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गौतम अदानी यांनी सात वर्षांपूर्वी अदानी कॅपिटल सुरू केली होती. ही कंपनी सर्व ग्राहकांना आर्थिक सुविधा पुरवते. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही कंपनी आता विकली जाणार आहे. या कंपनीचे स्टेक घेण्यासाठी कॅपिटलचा व्यवस्थापनाचा प्रमख भाग असलेले आणि लेहमन ब्रदर्स आणि मॅक्वेरी येथील माजी गुंतवणूक बँकर गौरव गुप्ता या अधिग्रहाणाचे नेतृत्व करत आहे. अदानी यांच्याकडे अदानी कॅपिटल्समध्ये 90 टक्के आणि कंपनीच्या व्यवस्थापनाचा भाग असणारे गौरव गुप्ता यांच्याकडे 10 टक्क्यांपर्यंत हिस्सा आहे.

- Advertisement -

बेन फ्रंटनर कंपनी अदानी कॅपिटलला 1500 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. बेन कॅपिटल पुढील फेरीत चर्चे आहे. 10 जुलैला पहिल्यांदाच अहवाल दिला होता की, कार्लाइल आणि सेर्बरस कॅपिटल हे तीन खासगी इक्विटी समूह अदानी कॅपिटल्सचे अधिग्रहण करण्याच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे.

अदानी समूह फायनान्स कंपनी अदानी कॅपिटलचे अधिग्रहण करण्याची शक्यता आहे. कारम अदानी यांच्याकडे 90 टक्के हिस्सेदारी गौतम अदानी यांच्याकडे आहे. तसेच 2016 मध्ये ते अदानी ग्रूपमध्ये सामिल झाले होते.

- Advertisement -

सहा दिवसांपूर्वी अदानी आणि त्यांच्या अदानी समूह यांच्यात चर्चा झाली होती. ज्याअंतर्गत ते निधी देण्याच्या गुंतवणुकीवर भर देत आहेत. अशा परिस्थितीतही अनिल अंबानी यांचा कोळसा ऊर्जा प्रकल्प विकत घेण्याची योजना अदानींनी आखली होती. परंतु अदानी कंपनीच आत फ्रंटफुटवरून बॅक फूटवर जाण्याच्या तयारीत आहे.


हेही वाचा : Seema Haider : पाकिस्तानात दरोडेखोरांकडून हिंदू मंदिरावर रॉकेट हल्ला; सीमा हैदरशी आहे कनेक्शन


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -