घरठाणेठाण्याच्या उपवन तलावात बुडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाण्याच्या उपवन तलावात बुडून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

Subscribe

ठाण्यातील उपवन तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला एक 17 वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. आदित्य लक्ष्मण पवार असे या मुलाचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे : पावसाळ्याच्या दिवसांत तरुणाई ही तलाव, धबधबे अशा ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. पण अनेकदा त्यांचा हा आनंद त्यांच्या जिवाशी बेतल्याच्या घटना घडलेल्या आहेत. रविवारी (ता. 16 जुलै) संध्याकाळी विरार पूर्वेकडील पापडखिंड धरण परिसरात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातील तलावात आणखी एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (17-year-old boy dies after drowning in Upvan lake in Thane)

हेही वाचा – पालघरमध्ये दुर्घटनांचे सत्र सुरूच; विरारच्या पापडखिंड धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील उपवन तलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेला एक 17 वर्षीय मुलगा बुडाल्याची घटना उघडकीस आली. आदित्य लक्ष्मण पवार असे या मुलाचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. आज (ता. 17 जुलै) दुपारी दोन ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास हा मुलगा बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. बुडालेल्या मुलाला शोधण्याचा प्रयत्न महापालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होता. अखेरीस तीन तासांच्या प्रयत्नांनंतर आदित्यला शोधण्यात यश आले आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. आदित्य हा आपल्या चार ते पाच मित्रांसोबत उपवन तलावात पोहण्यासाठी गेला होता.

उपवन तलावात बुडालेला आदित्य हा लोकमान्य नगर पाडा क्रमांक 04 येथील रहिवासी असून तो बारावीमध्ये शिकण्यास होता. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने दोन बोटीच्या सहाय्याने शोध घेण्यात आला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. ठाण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून नागरिक या पावसाचा आनंद घेण्यासाठी तलाव, धबधबे या ठिकाणी हजेरी लावत आहेत. परंतु आता अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांत धरण, तलाव आणि धबधब्यात बुडून मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या पालघर जिल्ह्यात घडत आहेत. पालघर जिल्ह्यात या घटना घडण्याचे सत्र हे सुरूच आहे. पालघरमध्ये वांद्री धरणात काल, रविवारी (ता. 16 जुलै) पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. राहुल सुरेश खरात (30) असे मृताचे नाव असून तो मुंबईच्या काळाचौकी भागातील रहिवासी होता. तर त्याआधी 11 जुलैला मुंबईच्या जोगेश्वरी येथील युवक मशीउद्दीन सलाउद्दीन खान या तरुणाचा जव्हार तालुक्यातील काळमांडवी धबधब्यात बु़डून मृत्यू झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -