घरताज्या घडामोडीघरकाम करणाऱ्या महिलेवर गौतम गंभीरने केले अंत्यसंस्कार

घरकाम करणाऱ्या महिलेवर गौतम गंभीरने केले अंत्यसंस्कार

Subscribe

ही महिला गेल्या सहा वर्षापासून गौतम गंभीर यांच्या घरात काम करत होती. २१ एप्रिल रोजी या महिलेचा मृत्यू झाला.

माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी देशात कोरोना विरोधात सुरू असलेल्या लढाई दरम्यान मानवतेचे एक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे. गंभीर यांनी मागील सहा वर्षापासून आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार केले. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशात राहणाऱ्या सरस्वती पात्रा या बराच काळ मधुमेह आणि रक्तदाबाशी झुंज देत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र सरस्वती यांनी २१ एप्रिल रोजी उपचार घेत असताना अखेरचा श्वास घेतला.

याबाबत गौतम गंभीरने ट्विट करून म्हटलं की, माझ्या कुटुंबातील ती एक भाग आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं हे माझं कर्तव्य होते. जात, धर्म, किंवा सामाजिक प्रतिष्ठेचा विचार न करता नेहमीच सन्मान ठेवा. माझ्यासाठी हा एक चांगला समाज तयार करण्याचा मार्ग आहे. माझ्या मते हाच भारत आहे. ओम शांती.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटात गेल्या ३० दिवसात रेशन किट आणि दररोज १० हजार लोकांना जेवणाचे वाटप केलं असल्याचं, गंभीर यांनी सांगितलं. तर ते पुढे म्हणाले की, सुमारे १५ हजार एन९५ मास्क, ४२०० पीपीई किट्स आणि शेल्ट होममध्ये २ हजार बेडची सुविधा उपलब्ध करू दिली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारहून अधिक आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे ७२१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली असल्याचं जाहीर केलं आहे.


हेही वाचा – CoronaVirus: उष्ण आणि दमट वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल – ट्रम्प


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -