घरट्रेंडिंगपालघर मॉब लिंचिंग : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल!

पालघर मॉब लिंचिंग : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल!

Subscribe

पालघर घटनेनंतर काही राजकीय पक्ष व संघटनांनी या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलं.

गेल्या आठवड्यात गुरूवारी रात्री पालघरमध्ये मॉब लिंचिंगचा संतापजनक प्रकार घडला. या घटनेत दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची पोलिसांसमोरच निर्घूण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातून संतापाची लाट उसळली. खारघरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पालघरमध्ये झालेल्या त्या घटनेचा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आणि दोन वर्गांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा त्याचप्रमाणे महाराष्ट्राची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचे आढळून आले. खारघर पोलिसांनी या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पालघर घटनेनंतर काही राजकीय पक्ष व संघटनांनी या घटनेला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच तापलं. या घटनेनंतर १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली.  मात्र त्यानंतर देखील खारघर येथे रहाणाऱ्या तृप्ती जयवंत देसाई या महिलेने पालघर येथील साधूंच्या हत्येचा व्हिडिओ आपल्या फेसबुकवर शेअर करुन महाराष्ट्र सरकारने याचे उत्तर द्यायलाच हवे, अशी पोस्ट टाकली आहे.

- Advertisement -

पोस्टमध्ये तृर्ती देसाई लिहीतात,

आम्हाला महाराष्ट्राचा पाकिस्तान बनवायचा नाही. महाराष्ट्रासारख्या संतभूमीमध्ये पालघर येथे महंतांची हत्या करण्यात येते, ते देखील पोलिसांसमोर, ठाकरे सरकार ह्या बद्दल काहीच का बोलत नाही? असा सवाल करत संबंधित फेसबुक पोस्टमध्ये राज्य सरकारबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. त्याचवेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे लिखाणही करण्यात आले आहे. त्याचप्रकारे या पोस्टवर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कमेंट दिसून आल्या.

तृप्ती देसाई ही महिला खारघरमध्ये रहात असून ती ती इन्शूरन्स एजंट आहे. या महिलेविरुद्ध आयटी अॅक्टसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – हल्ले करणाऱ्यांविरोधात नवीन अध्यादेश लागू होताच, गुजरातमध्ये पहिली अटक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -