घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronaVirus: उष्ण आणि दमट वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल - ट्रम्प

CoronaVirus: उष्ण आणि दमट वातावरणात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल – ट्रम्प

Subscribe

अमेरिकेतील कोरोना विषाणू प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ५० हजार जणांचा बळी गेला आहे. दरम्यान यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी (डीएचएस)चा अहवाला देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, थंड आणि कोरड्या हवामानापेक्षा उष्ण आणि दमट वातावरणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

व्हाईट हाऊस येथील पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले की, होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (डीएचएस)च्या वैज्ञानिकांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे की, वेगवेगळ्या तापमानात आणि हवामानात विषाणू प्रसार देखील वेगवेगळा असतो.

निष्कर्षांवरून असं कळतं की, थंड आणि कोरड्या वातावरणात विषाणू जास्त काळ टिकून राहतो. तर उष्ण आणि दमट वातावरणात विषाणू टिकून न राहता प्रादुर्भाव कमी होत जातो. यापूर्वी उष्ण हवामानात विषाणूवर होणार परिणामचा प्रस्ताव दिला होता. पण त्यातून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता आणि आता तसं दिसतं आहे, असं ट्रम्प म्हणाले.

- Advertisement -

ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवत डीएचएसचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागाचे प्रमुख बिल ब्रायन म्हणाले, सूर्यप्रकाश आणि दमट वातावरणात कोरोना विषाणू जास्त वेगाने नष्ट होईल. सूर्यप्रकाशामुळे विषाणू लवकर नष्ट होतात. आयसोप्रोपिल अल्कोहोल ३० सेकंदात विषाणूचा नाश करेल.

आतापर्यंत अमेरिकेत गेल्या २४ तासांत ३ हजार १७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा ५० हजार झाला आहे , अशी माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाने दिली आहे.


हेही वाचा – Corona: ‘ही’ ठरू शकतात ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पराभवाची कारणं


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -