घरताज्या घडामोडी"हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा" पोलिसांनी नाना पटोलेंना अटक करावं, नारायण राणेंची मागणी

“हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा” पोलिसांनी नाना पटोलेंना अटक करावं, नारायण राणेंची मागणी

Subscribe

मला कोणतेही आश्चर्य वाटत नाही आहे की, काँग्रेस नेते या स्तरावर गेले आहेत. नाना पटोलेंना अटक करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटल आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारु शकतो असे वक्तव्य केल आहे. पटोलेंच्या विधानावरुन भाजप नेत्यांनी काँग्रेस नेत्यांवर आणि नाना पटोलेंवर घणाघात केला आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे पोलिसांनी आता काँग्रेस नेते नाना पटोलेंना अटक करावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. पंतप्रधानांविरोधात वक्तव्य केल्यामुळे नाना पटोलेंवर भाजप नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. पंरतु पंतप्रताधानांविषयी वक्तव्य केलं नसल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले मोदींना मारु शकतो त्यांना शिव्या देऊ शकतो असे म्हणत आहेत. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. मला कोणतेही आश्चर्य वाटत नाही आहे की, काँग्रेस नेते या स्तरावर गेले आहेत. नाना पटोलेंना अटक करण्याची पोलिसांची जबाबदारी आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला मुद्दा असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटल आहे.

- Advertisement -

नाना पटोले काय म्हणाले ?

भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने नाना पटोलेंनी आपल्या मतदारसंघात विविध ठिकाणी सभा घेतल्या होत्या. संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेदरम्यान पटोले यांनी मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद पेटला आहे.

- Advertisement -

फडणवीसांची नाना पटोलेंवर टीका

नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानांवर भाजपने टीका केली आहे. पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो. तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो…काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केली आहे.


हेही वाचा : माझे वक्तव्य मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत, नाना पटोलेंचे मोदींना मारण्याच्या विधानावर स्पष्टीकरण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -