घरदेश-विदेशपाकिस्तानात आले १ हजार रूपये किलो, मिरची २०० रूपयांवर झोंबली

पाकिस्तानात आले १ हजार रूपये किलो, मिरची २०० रूपयांवर झोंबली

Subscribe

जगाला कांदा पुरवणाऱ्या पाकिस्तानकडून होतेय कांद्याची आयात

भारतातले कांद्याचे दर आणि भारतातली महागाई यावरून भारतीयांना नाव ठेवणारे आणि स्वतःचेच कौतुक करून घेणारे पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना आपल्याच देशात जनतेसमोर नामोहरम होण्याची वेळ आली आहे. विरोधकांसोबतच एकेकाळच्या पत्नी राहिलेल्या रेहम खान यांनीही त्यांच्या कारभाराची लक्तरे ही वेशीवर टांगली आहेत. पाकिस्तानात महागाईने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. एकीकडे पंतप्रधान इम्रान खान भाज्यांच्या दरात घट झाल्याबद्दल स्वतःला शाब्बाशकी देण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेचे मात्र महागाईने कंबरडे मोडले आहे. सर्वसामान्यांसाठी रोजच्या वापरातले आल्याच्या किंमतीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. रावळपिंडीत एक किलो आले हे १ हजार रूपये प्रति किलो इतक्या दराने मार्केटमध्ये विकले जात आहे. तर शिमला मिर्चीच्या किंमतीने २०० रूपये प्रतिकिलो इतका दर गाठला आहे. याआधी पाकिस्तानात पिठाच्या किंमतीवरून भडका उडाला होता. इम्रान खान यांच्या आधीच्या पत्नीनेही हा नेमका धरून आल्याची किंमत एक हजार रूपये किलो झाल्याचे ट्विट केले आहे.

- Advertisement -

इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की आता साखरेचा दर ८१ रूपयांवर खाली घसरला आहे. आपल्या सरकारच्या धोरणामुळेच शंभरी पार केलेल्या साखरेच्या दर थेट १०२ रूपयांवरून ८१ रूपये इतका दर घसरलाचा दावा त्यांनी केला होता. साखरेच्या किंमती कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीमचेही त्यांनी कौतुक केले होते. पण पाकिस्तानात एकीकडे सर्वसामान्यांसाठी अत्यावश्यक अशा भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतानाच अन्नपुरवठ्याची कमतरता हा विषय नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

- Advertisement -

पाकिस्तानात सध्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची तूट निर्माण झाली आहे. जो पाकिस्तान जगभराला कांदा पुरवायचा त्याच पाकिस्तानला आता आपल्याच देशात कांद्याची किंमती कमी करण्यासाठी कांदा आयात करण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानात पिठाच्या आणि साखरेच्या किंमती करण्यासाठी टीम इम्रान खान यांच्या सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या सध्या सुरू आहेत. या संकटातच भर म्हणजे गव्हाच्या किंमतीनेही सर्व प्रकारचे रेकॉर्ड मोडले आहेत. गव्हाला सध्या पाकिस्तानी जनतेला किलोमागे ६० रूपये इतका दर मोजावा लागत आहे. साधारणपणे ४० किलोच्या पोत्याला २४०० रूपये मोजावे लागत आहे. पाकिस्तानात अन्नधान्याचे भाव कमी करण्यासाठी पाकिस्तानचे सगळ्या प्रकारचे प्रयत्न आता अयशस्वी होताना दिसत आहेत. गेल्या वर्षी ५० रूपये किलो असणाऱ्या गव्हाचा विक्रम यंदा ऑक्टोबरमध्येच मोडला असून ६० रूपये प्रति किलो इतका दर ग्राहकांना सध्या मोजावा लागत आहे.

विरोधकांशी भिडलेल्या इम्रान खान यांना या सगळ्या लढाईत सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत अशा अन्नधान्याच्या प्रश्नांचा सफशेल विसर पडलेला आहे. विरोधकांच्या रॅलीमध्ये सत्ताधारी सरकारविरोधतला असंतोष पाहून इम्रान खान सरकारची झोप उडाली आहे. इम्रान खान यांना सत्तेवरून खेचण्यासाठी विरोधकांनी एकजुट करत आता कंबर कसली आहे. त्यामध्ये पाकिस्तानच्या सेनेनेही सध्याचे इम्रान खान सरकार विरोधतले वारे पाहता या सरकारची साथ सोडली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -