घरदेश-विदेशभाजपला गोव्यात सलग दोन धक्के; पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत महिला आमदाराचा...

भाजपला गोव्यात सलग दोन धक्के; पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत महिला आमदाराचा राजीनामा

Subscribe

भाजपच्या आमदार ॲलीना सल्दान्हा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भाजपला सलग दोन दिवस दोन धक्के बसले आहेत. सेक्स स्कँडलमध्ये सहाभागी असल्याचा आरोप झाल्यानंतर भाजप सरकारमधील मंत्री मिलींद नाईक यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आणखी एक महिला आमदार ॲलीना सल्दान्हा यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देत असताना त्यांनी पक्षावर आणि नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

मी राजीनामा दिला कारण त्यामागे ठोस अशी कारणे आहेत. माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर मी त्यांचं कार्य पुढे नेलं. पक्षासाठी काम केलं. पण तेव्हा जो पक्ष होता तो आजच्या घडीला राहिलेला नाही. पक्षाला तत्त्वांचा विसर पडला असून पक्षात अनागोंदी माजली आहे, असं ॲलीना सल्दान्हा म्हणाल्या. तसंच, भाजप पक्षात कोण येतं, कोण जातं, याचा कोणालाच थांगपत्ता नसतो. अशा स्थितीत बुधवारी पक्षाच्या बैठकीत जी प्रमुख नेत्यांनी विधाने केली ती धक्कादायक होती. तेव्हाच आता या पक्षात रहायचं नाही, असं मी ठरवल्याचं ॲलीना सल्दान्हा म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आम आदमी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना अद्याप मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं त्यांनी सांगितलं. सगळेच पक्ष मला संपर्क करत आहेत पण मला लगेचच निर्णय घेता येणार नाही. माझ्या मतदारसंघातील नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतरच मी पुढचं पाऊल टाकणार आहे, असं ॲलीना सल्दान्हा यांनी सांगितलं.

दरम्यान, गोव्यात विधानसभा निवडणुकीआधी मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत असून आतापर्यंत विविध पक्षांच्या ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

- Advertisement -

सेक्स स्कँडलचा आरोप, मंत्र्याचा राजीनामा

काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणेकर यांनी भाजप आमदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर सेक्स स्कँडलमध्ये सहभाग असल्याचा दावा करत गंभीर आरोप केला होते. याबाबत सबळ पुरावेही असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर मिलिंद नाईक यांचा राजीनामा घेण्यात आला.


हेही वाचा – ममतादीदींचा पवारांना धक्का, गोव्यात राष्ट्रवादी पक्ष तृणमूलमध्ये विसर्जीत


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -