घरक्रीडाBig Bash League 2021 : कर्णधार मॅक्सवेलची शतकीय खेळी अपयशी; सिडनी सिक्सर्सकडून...

Big Bash League 2021 : कर्णधार मॅक्सवेलची शतकीय खेळी अपयशी; सिडनी सिक्सर्सकडून मेलबर्न स्टार्सचा ७ गडी राखून पराभव

Subscribe

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये लोकप्रिय बिग बॅश लीगचा थरार सुरू आहे

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये लोकप्रिय बिग बॅश लीगचा थरार सुरू आहे. बुधवारी स्पर्धेतील १३ वा सामना मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात पार पडला. दरम्यान या सामन्यात षटकार आणि चौकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १७७ धावांची खेळी केली. तर मेलबर्नकडून कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक १०३ धावांची शतकीय खेळी केली. मात्र लक्षणीय बाब म्हणजे सिडनी सिक्सर्सच्या संघाने हा सामना २ चेंडू राखून जिंकला. सिडनीकडून जोश फिलिपने नाबाद ९९ धावांची आक्रमक खेळी केली. मेलबर्नमध्ये झालेल्या या सामन्यात सिडनी सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्टार्सकडून सुरूवात निराशाजनक झाली आणि संघाचा पहिला गडी केवळ ३ धावांवर बाद झाला.

मार्कस स्टोइनिस केवळ ३ धावांवर बाद झाला तर क्लार्क खाते न उघडताच माघारी परतला. त्यानंतर निक लार्किन आणि कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने संघाचा डाव सावरला. लार्किनने २३ धावांची साजेशी खेळी केली. दरम्यान मॅक्सवेलने आक्रमक खेळी करून ५७ चेंडूत १०३ धावा केल्या. मॅक्सवेलने त्याच्या शतकीय खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार लगावले. मॅक्सवेलच्या दमदार खेळीच्या बदल्यात मेलबर्न स्टार्सच्या संघाने सिडनीसमोर १७८ धावांचे आव्हान उभे केले.

- Advertisement -

फिलिपच्या खेळीने मॅक्सवेलची शतकीय खेळी अपयशी

दुसऱ्या डावात सिडनी सिक्सर्सला विजयासाठी १७८ धावांची गरज होती. सिडनीच्या संघाची सुरूवात चांगली झाली नव्हती. मात्र पहिल्या फळीतील फलंदाजांनी साजेशी खेळी करून संघाची सुरूवात चांगली करण्यास हातभार लावला. सिडनीचे मधल्या फळीतील फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर जोश फिलिपने एकतर्फी खेळी करून सामन्याचा निकाल बदलला. त्याने ६१ चेंडूत ९९ धावांची नाबाद शानदार खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीत ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्या सोबतच जार्डन सिल्क २५ धावा करून नाबाद राहिला. तर फिलिपच्या नाबाद खेळीने मॅक्सवेलची शतकीय खेळी अयशस्वी ठरवून सिडनीच्या संघाला विजय मिळवून दिला.


हे ही वाचा:  http://IPL 2022 : हैदराबादचा गोलंदाजी कोच बनू शकतो डेल स्टेन; जाणून घ्या कसा असणार कोचिंग स्टाफ

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -