घरताज्या घडामोडीGoa election 2022 : सिंचनाची व्यवस्था, फिश फार्मिंगला प्रोत्साहन, फळ-फुलबागांसाठी अनुदान, राष्ट्रवादीचे...

Goa election 2022 : सिंचनाची व्यवस्था, फिश फार्मिंगला प्रोत्साहन, फळ-फुलबागांसाठी अनुदान, राष्ट्रवादीचे गोवेकरांना आश्वासन

Subscribe

राष्ट्रीय हरीत लवादाचे नियम पाळून मायनिंग पुन्हा सुरु झाले पाहीजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे नवाब मलिक म्हणाले. मात्र मायनिंगचे कंत्राट देताना त्यात लिलाव पद्धत आणली तर सरकारला महसूल मिळेल. मायनिंगवर कायमची बंदी घालणे हा उपाय नसल्याची भूमिका नवाब मलिक यांनी घोषणापत्र जाहीर करताना मांडली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडू गोव्यातील नागरिकांसाठी घोषणापत्र जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनसुद्धा गोव्यातील नागरिकांना मोठी मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. गोव्यातील शेतकऱ्यांना संचिनाची व्यवस्था, फिश फार्मिंगला प्रोत्साहन आणि फळबाग-फुलबागांसाठी अनुदान देणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक प्रचारासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. नवाब मलिकांनी गोव्यात राष्ट्रवादीचे घोषणापत्र जाहीर करण्यात आले आहे. गोव्यात सत्ता मिळवण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरु आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून १३ जागांवर उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे १३ जणांवर निवडणूक लढवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गोव्यात घोषणापत्र जाहीर करण्यात आले आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टीकडूनही गोव्यात घोषणापत्र जाहीर करण्यात आले आहे. कोणत्याही पक्षाला गोव्यात स्पष्ट बहुम मिळणार नाही असे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिगर भाजप आघाडीला पाठिंबा देऊन गोवेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या घोषणापत्रात गोवेकरांसाठी कोणती आश्वासनं

गोवा हे पूर्वी शेतीप्रधान राज्य होते. आताही गोव्यात ३० टक्के लोक शेती करत आहेत. मात्र त्यांना सिंचनाच्या सुविधा दिलेल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास सिंचनाच्या व्यवस्था, ग्रीन हाऊसेसची सुविधा, फळबाग-फुलबागा फुलविण्यासाठी विविध अनुदाने देण्यात येतील. पशूसंवर्धन व पशूपालनाच्या माध्यमातून जोडधंदा देण्यासाठी प्रयत्न केले जातील. सेच गोव्यात ॲक्वा फिशिंग कमी होत आहे. समुद्रातील मासेमारीसोबत फिश फार्मिंगसाठी प्रोत्साहन देण्यात येईल असे नवाब मलिक यांनी सांगितले.

गोव्यामध्ये शेतीत काम करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत, अशी बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली. शेतमजूर मिळवून देण्यासाठी मनरेगासारखी योजना गोव्यासाठी तयार करता येईल का? याचाही विचार राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास करेल.

- Advertisement -

गोव्यातील पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न

गोव्यात पर्यटन हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. गोव्यात कुटुंबआधारीत पर्यटन कसे वाढवता येईल, याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही नवाब मलिक म्हणाले. सध्या गोव्यात कसिनोप्रधान टुरिझम आहे. मध्यमवर्गीयांना गोव्याचे पर्यटन परवडत नाही. त्यासाठी फॅमिली संकल्पना सुरु करणार आहोत. गोव्यात राहणाऱ्या स्थानिकांच्या घरात पुरेशा खोल्या असतील तर त्यांना पर्यटन परवाना देऊन त्यांना व्यवसाय करण्याची मुभा देण्यात येईल. जेणेकरुन सामान्य लोकही पर्यटन व्यवसाय करु शकतील, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

तसेच कौशल्य विकास करण्यासाठी वेबसाईट तयार केली जाईल. त्यामाध्यमातून सामान्य लोकांना पर्यटनाच्या सुविधा कशा द्याव्यात, याचे प्रशिक्षण देण्यात येईल. फॅमिली टुरिझमच्या संकल्पनेमुळे सामान्य लोकांच्या हातात पैसे जातील. ज्यामुळे बेरोजगारी दूर होण्यास मदत होईल, असेही मलिक म्हणाले. गोव्याचा विकास साधत असताना पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होता कामा नये. राष्ट्रीय हरीत लवादाचे नियम पाळून मायनिंग पुन्हा सुरु झाले पाहीजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असल्याचे नवाब मलिक म्हणाले. मात्र मायनिंगचे कंत्राट देताना त्यात लिलाव पद्धत आणली तर सरकारला महसूल मिळेल. मायनिंगवर कायमची बंदी घालणे हा उपाय नसल्याची भूमिका नवाब मलिक यांनी घोषणापत्र जाहीर करताना मांडली आहे.


हेही वाचा : Goa Election 2022 : संजय राऊत -नाना पटोलेंची गोव्यात भेट, राऊतांकडून सूचक ट्विट

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -