घरताज्या घडामोडीGoa Assembly Election 2022: गोव्यात जोरदार लढाईचा आदित्य ठाकरेंचा पवित्रा, भविष्यात शिवसेनेचे...

Goa Assembly Election 2022: गोव्यात जोरदार लढाईचा आदित्य ठाकरेंचा पवित्रा, भविष्यात शिवसेनेचे राज्य येणार – संजय राऊत

Subscribe

गोव्याचा बुलंद आवाज आहे, की शिवसेना आम्हाला हवी आहे. जिथे जिथे आम्ही घरात जात आहोत, तिथे आम्हाला सांगत आहेत की तुम्ही आधी का नाही आलात, आम्ही तुमची वाट पाहतो आहोत. गोव्यात शिवसेना नवीन नाही. पण आदित्य ठाकरे यांनी ठरवले की जोरदार लढाई करायची. गोव्याच्या विधानसभेवर आमदार जातील आणि भविष्यात गोव्यावर शिवसेनेचे राज्य येईल. काल पंतप्रधान याठिकाणी होते, त्यांनीही गोव्याचे नाते सांगितले. पण दहा वर्षे भाजपचे सरकार असूनही याठिकाणी काही भागात पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गोव्यात केली. अनेक ठिकाणी लोकांना रोजगाराचा विषय आहे, पण नुसत नात सांगून प्रश्न सुटत नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. गोव्यातील साखळी मतदारसंघातील सभेत संजय राऊत बोलत होते.

पंतप्रधान म्हणाले गोव्याशी जुन नात आहे. गोव्यासोबत कोणाचे नाते असेल, तर ते शिवसेनेचे आहे. गोव्याची भाषा, गोव्याची संस्कृती आणि आमचे सगळ्यांचे देव गोव्यात आणखी काय नाते हवे ? आणखी नात्याचे सर्टीफिकेट आणून दाखवू. अर्धे गोवेकर मुंबईत आहेत आणि जे आहेत ते शिवसेनेत आहेत. आम्हाला गोव्याचे नाते सांगू नका. गोव्यातील सर्वात जुना पक्ष आहे त्या पक्षाचे नावच महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष आहे. त्या पक्षाचे जे पहिले मुख्यमंत्री होते भाऊसाहेब बांदोडकर त्यांची आणि बाळासाहेबांची जीवलग मैत्री होती. आम्ही शिवसेनेत आलो नाही कारण बाळासाहेब सांगायचे की भाऊसाहेब आपले शिवसेनेचेच काम करतोय. ते हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद करत आहेत. त्यामुळे आपल्याला गोव्यात जाण्याची गरज नाही. पण आता आम्ही ठरवल आहे की, गोव्यात भगवा झेंडा फडकवायचा असेल तर तो शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि मराठी माणसाचा, कोकणी जनतेचा झेंडा फडकावणार. म्हणून आम्ही सगळे व्यासपिठावर आहोत.

- Advertisement -

गोवेकरांनी संधी द्यावी

उदय सामंत, विनायक राऊत, राजन विचारे, किशोरीताई, फातर्फेकर, श्रद्धा, वैभव नाईक, संदेश पारकर, पडते ज्यांचा ज्यांचा गोव्याशी संबंध आहे, ते सगळे आहेत. ज्यांच्या गोव्याशी आणि शिवसेनेशी संबंध आहे, ते सगळे आहेत. सगळा गोवा आम्ही पिंजून काढला आहे. जे आले आहेत. जे मुंबईतून आले, शिवसेनेतून आले त्यांना ७२ तास महत्वाचे. स्थानिक लोकांचेही प्रश्न आम्हाला माहित आहेत. दहा वर्षे राज्य असून लोक पाण्यासाठी रडत होते. रोजगार नाही, कोणते नाते तुम्ही सांगत आहात? आपण एक संधी द्या, आपण ती देणार आहात.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -