घरदेश-विदेशToday Gold Rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीचे दरही वाढले

Today Gold Rate: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीचे दरही वाढले

Subscribe

भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला वेग येताच सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. लसीकरण मोहिम सुरु असतानाच कोरोना रुग्णांच्या आकडेवारीही दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सोने गुंतवणुकदारांमध्येही चिंतेत सापडले आहेत. देशात आर्थिक अनिश्चतता पुन्हा वाढत असल्याने सोने दरही वाढत आहेत. आज (सोमवारी) सोने, चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दर १५० तर चांदी ५०० रुपयांनी महागली आहे.मल्टी कमॉडिटी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार आज सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव ४४९०० रुपये आहे तर चांदीचा प्रति.कि दर ६७३५१ रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या तुलनेत सोन्याचा भाव १५० रुपयांनी वाढला आहे तर चांदीच्या दरात ५०७ रुपयांची वाढ झाली आहे.

सोने चांदी बाजारांची आकडेवारी सांगणाऱ्या गोल्ड रिटर्न्स(good returns) वेबसाईटनुसार, आज सोमवारी मुंबई २४ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना ४४८४० रुपये मोजावे लागणार आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४३८४० रुपये इतका खाली आला आहे. तर दिल्लीत २४ कॅरेट सोन्यासाठी ४८१७० ग्राहकांना द्यावे लागणार आहेत तर २२ कॅरेट सोन्यासाठी ४४१६० मोजावे लागणार आहेत. तर कोलकत्यामध्ये २४ कॅरेट सोने ४६९५० वर पोहचले आहे तर २२ कॅरेट सोने ४४३१० रुपये इतके आहे.

- Advertisement -

 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -