घरदेश-विदेशबँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 314 जागांसाठी 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 314 जागांसाठी 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करा

Subscribe

आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी तत्काळ अर्ज करावा. शेवटची तारीख संपल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

नवी दिल्लीः बँक ऑफ महाराष्ट्रने अप्रेंटिससाठी अर्ज काढले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रने अधिनियम 1961 अंतर्गत एकूण 314 अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 13 डिसेंबर 2022 पासून सुरू होत असून, 23 डिसेंबर 2022 पर्यंत चालणार आहे. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी तत्काळ अर्ज करावा. शेवटची तारीख संपल्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

या तारखा लक्षात ठेवा

- Advertisement -

ऑनलाइन अर्जाची सुरुवातीची तारीख – 13 डिसेंबर 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 डिसेंबर 2022

- Advertisement -

उमेदवाराचे वय किती असावे?

बँक ऑफ महाराष्ट्र भरती अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता दिली जाईल.

प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी सर्व उमेदवारांना पहिल्यांदा बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ‘करिअर्स’ वर क्लिक करून ‘करंट ओपनिंग्ज’ वर क्लिक करावे लागेल. आता Apply Online under Apprentices Act 1961 Project 2022-23 वर क्लिक करा. आता ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा. अर्जाच्या नोंदणीसाठी ‘नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करा’. आता टॅब निवडा आणि तुमचा तपशील भरा. उमेदवारांनी आता काळजीपूर्वक तपशील भरून त्याची खातरजमा करून घ्यावी. तुमच्या तपशीलाची पडताळणी करा आणि ‘तुमचे तपशील पडताळणी करा’ आणि ‘पुढे जा’ बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज भरा. त्यानंतर, अर्जाचा इतर तपशील भरा. तपशीलाची पडताळणी केल्यानंतर ‘पूर्ण नोंदणी’ वर क्लिक करा. फॉर्म भरल्यानंतर तो एकदा पूर्णपणे तपासा. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा. प्रशिक्षणार्थी उमेदवाराच्या 314 जागांसाठी 23 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.


हेही वाचाः मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्या जाणार दिल्ली दौऱ्यावर, सीमावादावर तोडगा निघणार?

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -