घरCORONA UPDATEमद्यप्रेमींसाठी खुशखबर! 'या' राज्यात मिळणार आता घरपोच दारू!

मद्यप्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ राज्यात मिळणार आता घरपोच दारू!

Subscribe

काल मद्याची दुकानं उघडणार म्हटल्यावर दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या. मद्य घ्यायला उसळलेली गर्दी बघून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली.

देशात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकानं उघडी ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. पण मद्याची दुकानं उघडताच नागरिकांनी गर्दी केली. मद्याच्या दुकानांवर होणारी गर्दी लक्षात घेता. पंजाब सरकारने मद्याची होम डिलिव्हरी करण्याचा विचार केला आहे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारने मद्याची होम डिलिव्हरी सुरू केली आहे.

काल मद्याची दुकानं उघडणार म्हटल्यावर दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या. मद्य घ्यायला उसळलेली गर्दी बघून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मद्याच्या दुकानांपुढे लोकांची मोठी गर्दी होत असून दुकानांपुढे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड होत असल्याचे चित्र काल सर्वत्र दिसले. त्यामुळेच पंजाब सरकारने होम डिलिव्हरीचा विचार केला आहे. तर छत्तीसगड सरकारनेही याच कारणामुळे होम डिलिव्हरीचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमध्ये मद्याची होम डिलिव्हरी सुरू

छत्तीसगडमध्ये राज्य सरकारने दुकानांवर होणार गर्दी कमी करण्यासाठी मद्याची होम डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे छत्तीसगडमध्ये मद्य खरेदी करता येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे याच उद्देशाने मद्याची होम डिलिव्हरी करण्याची परवानगी छत्तीसगड सरकारने दिली आहे.

पंजाबमध्ये या निर्णयाला विरोधही

पंजाबमध्ये मद्याच्या होम डिलिव्हरीला विरोधही होत आहे. पंजाबचे कॅबिनेट मंत्री त्रिपत रजिंदरसिंग बाजवा यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दारूची दुकाने सुरू करणे योग्य आहे,  मात्र होम डिलिव्हरीच्या मी विरोधात आहे. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेईल, असे बाजवा यांनी म्हटले आहे. पंजाब सरकार या निर्णयावर पुढील मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांचा सरकारकडे प्रस्ताव

दारूची दुकाने बंद राहिल्याने दर महिन्याला पंजाबचे ५०० कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीच सर्वप्रथम दारुची दुकाने उघडण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता.


हे ही वाचा – कोरोनाविरोधी लढण्यात बॉलिवूड कलाकारांची लाखमोलाची मदत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -