घरदेश-विदेशउमर खय्याम यांच्या जयंती निमित्त गूगलने साकारले खास डूडल

उमर खय्याम यांच्या जयंती निमित्त गूगलने साकारले खास डूडल

Subscribe

प्रसिद्ध गणितज्ज्ञ उमर खय्याम यांची आज ९७१ वी जयंती आहे.

अरब विश्वातील सर्वश्रेष्ठ गणिततज्ज्ञ तसेच ‘जन्म आणि मृत्यू’ ही माणसाच्या जीवनचक्राबद्दल सांगणारे प्रसिद्ध गणितज्ज्ञ उमर खय्याम यांची आज ९७१ वी जयंती आहे. या थोर गणितज्ज्ञाला आदरांजली म्हणून शनिवारी गुगलनेही खास डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे.

- Advertisement -

प्रकाशाची गतीचा अचूक शोध

उमर खय्याम हे अरब राजवटीतील सर्वोत्कृष्ट गणितज्ज्ञ आणि भविष्यवेत्ता होते. बीजगणिताच्या सिद्धांताचा वापर त्यांनी प्रथमच भूमितीचे प्रश्न सोडवण्यासाठी केला होता. प्रकाशाची गती सहाव्या एककापर्यंत त्यांनी अचूक शोधली होती. आपल्या गणिती प्रमेयांच्या साहाय्याने त्यांनी पहिलं सौर कॅलेंडर बनवलं होतं.

- Advertisement -

 

गणित आणि साहित्याची आवड

भूमितीतील हायपरबोला आणि त्यासंबंधित समीकरणांची निर्मितीही त्यांनी केली होती. एरवी गणित आणि साहित्य दोन्हींची आवड असणारी माणसं क्वचितच आढळतात. पण खय्याम यांनी मात्र या दोन्ही विषयांमध्ये प्रभुत्व मिळवले होते. खय्याम यांच्या कविता आजही साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट कृती म्हणून पाहिल्या जातात. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करून त्यांनी ज्योतिषशास्त्रातही अनेक शोध लावले होते.

मानवंदना देण्यासाठी गुगलने खास डुडल

याच महान साहित्यिकाला, गणितज्ज्ञाला मानवंदना देण्यासाठी गुगलने खास डुडल ठेवलं आहे. या गुगलमध्ये प्रतिकांच्या साहाय्याने खय्याम यांचे सगळे गुण दर्शवण्यात आले आहेत. त्यांनी लावलेला प्रकाशाच्या वेगाचा शोध, त्याचे साहित्य भूमितीतील शोध सर्वच या चित्रात विविध प्रतिकांनी रंगवण्यात आलं आहे.

२०१२ मध्येही सर्व सर्च इंजिनने खय्याम यांचा ९६४ व्या वाढदिवसाच्या दिवशी गूगलने समर्पित केले होते. भारताशिवाय डूडल रूस, मध्य पूर्व, उत्तर अफ्रीकेत असणाऱ्या देशात, अमेरिकेतील गूगलच्या यूजर्सना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -