घरदेश-विदेशसरकार माझा आवाज दाबू शकत नाही - पी. चिदंबरम

सरकार माझा आवाज दाबू शकत नाही – पी. चिदंबरम

Subscribe

आयएनएक्स मीडिया प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी तब्बल १०६ दिवसांनंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत ‘सरकार माझा आवाज दाबू शकत नाही’ अशी मोदी सरकारवर टिका केली आहे. कोणतेही आरोप नसताना नेत्यांना अटक करण्यात आल्याची टिका त्यांनी मोदी सरकारवर केला आहे. यावेळी जीएसटी, नोटबंदी यांसारख्या केंद्र सरकारच्या निर्णयांवर पी. चिदंबरम यांनी टिका केली. दरम्यान आयएनएक्स मीडिया प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्यानं त्यावर कोणतीही टिप्पणी करण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

काय म्हणाले पी. चिदंबरम?

पत्रकार परिषदेत बोलताना पी. चिदंबरम म्हणाले की, “स्वातंत्र्याची कोणतीही किंमत असू शकत नाही. आपल्याला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आपल्यालाच लढावं लागेल.” यावेळी त्यांनी देशाच्या सद्य अर्थव्यवस्थेवर टिका केली. ते म्हणाले की, “देशात मंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्था ८ टक्क्यांवरून घसरून ४.५ टक्क्यांवर येऊन पोहचली आहे. परंतु, सरकार मात्र हे मान्य करायला तयार नाही, असे म्हणतानाच, सद्य वर्षाच्या शेवटपर्यंत आर्थिक वृद्धी ५ टक्क्यांवर जरी आली तरी आपण भाग्यशाली ठरू,” असा टोमणासुद्धा त्यांनी यावेळी मोदी सरकारला मारला.

- Advertisement -

हेही वाचा – १०६ दिवसानंतर चिदंबरम तिहार तुरुंगातून बाहेर; जामीन मंजूर

‘असमर्थ व्यवस्थापक’ असल्याची टिका

ते पुढे म्हणाले की, “माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यम यांनी आधीच चेतावणी दिली होती. ज्या पद्धतीनं मोदी सरकार जनतेसमोर आकडे सादर करत आहे त्याप्रमाणे अर्थव्यवस्थेची वृद्धी ५ टक्के नाही तर १.५ टक्क्यांपेक्षाही कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घसरत्या अर्थव्यवस्थेवर गप्प का? असा सवाल करतानाच हे सरकार अर्थव्यवस्थेचं ‘असमर्थ व्यवस्थापक’ असल्याची जळजळीत टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. एवढेच नाही तर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जीएसटी आणि नोटबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -