घरदेश-विदेश१०६ दिवसानंतर चिदंबरम तिहार तुरुंगातून बाहेर; जामीन मंजूर

१०६ दिवसानंतर चिदंबरम तिहार तुरुंगातून बाहेर; जामीन मंजूर

Subscribe

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी चिदंबरम २१ ऑगस्टपासून तिहार तुरुंगात कैद होते. आज त्यांचा जामीण मंजूर करण्यात आला आहे. तब्बल १०६ दिवसांनंतर चिदंबरम आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत. २ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि दोन जणांच्या हमीवर सुप्रीम कोर्टाने सदर जामीन दिला आहे. मात्र काही अटी देखील घातल्या आहेत. जामीन काळात चिदंबरम यांना कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर प्रवास करता येणार नाही. तसेच आयएनएक्स मीडिया प्रकरणाबाबत माध्यमं किंवा समाज माध्यमावर व्यक्त होण्यापासून निर्बंध लावले आहेत.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आर. बानुमती यांनी २८ नोव्हेंबर रोजी जामीनाबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. आयएनएक्स मीडिया कंपनीद्वारे मनी लॉड्रिंग केले असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. यापूर्वी दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांचा जामीन फेटाळून लावला होता. त्यानंतर त्यांनी १५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -