घरदेश-विदेशपॅन-आधारकार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

पॅन-आधारकार्ड जोडणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Subscribe

पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून ३० सप्टेंबरपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

पॅनकार्ड (परमनंट अकाऊंट नंबर) आणि आधारकार्ड क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन-आधार जोडणीची मुदतवाढ ३१ मार्चपर्यंत होती. मात्र केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) ने घेतलेल्या निर्णयानुसार ही मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पॅन-आधार जोडणीची ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. सीबीडीटीतर्फे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे रविवारी ही माहिती देण्यात आली आहे.

सहावेळा मुदतवाढ

पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडणीस आतापर्यंत सहावेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०१८ ला पॅन-आधार जोडणीची मुदतवाढ ३१ मार्च २०१९ पर्यंत वाढवण्यात आली होती होती. मात्र आधार क्रमांकाशी जोडणी केलेले पॅन अवैध ठरु शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सीबीडीटाने सांगितले आहे. तसेच ही मुदत जरी वाढवली असली तरी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे १ एप्रिलपासून अनिर्वाय असेल, असेही सीबीडीटाने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

वाचा – आधार कार्डबाबत केंद्र सरकारने केली नवी घोषणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -