घरCORONA UPDATEचिंताजनक! WHO ने दिले संकेत; दातांच्या डॉक्टरांना कोरोनाचा धोका जास्त

चिंताजनक! WHO ने दिले संकेत; दातांच्या डॉक्टरांना कोरोनाचा धोका जास्त

Subscribe

कोरोनावर उपचार करणाऱ्या जगभरातील अनेक आरोग्यक्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना योद्ध्यांना या महामारीत आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जागितक आरोग्य संघटना (WHO) च्या तज्ज्ञांनी दातांच्या डॉक्टरर्सना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. WHO वाढत्या संक्रमणात डॉक्टरांकडून रुटीन चेकअप करताना स्वतःचा बचाव करण्याचा सल्ला दिला आहे. या महामारीचा धोका सर्वाधिक दातांच्या डॉक्टरांना असल्याचे WHO ने म्हटले असून त्यांनी याकरता काही नियमावलीदेखील आखून दिली आहे.

WHO ने दिलेली नियमावली

  • रुग्णांचे रुटीन चेकअप करताना काळजी घेणे
  • जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांची ओरल ट्रीटमेंट न करणे
  • जर आपतकालीन स्थिती उद्भवत असेल तर रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे सल्ला देणे

WHO ने दिलेल्या माहितीनुसार डॉक्टरर्स सध्या संक्रमणाच्या हायरिस्क झोनमध्ये आहे. अशा स्थितीत दातांसंबंधी समस्यांचा उपचार करत असताना लाळेत असलेल्या व्हायरसमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही मार्गातून व्हायरसची लागण होऊ शकते.

- Advertisement -

डेंटल क्लिनिकमध्ये डॉक्टर एअरोसोल जनरेटिंग प्रक्रियेचा वापर करतात. याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. गाईडलाईन्सनुसार तोंडातील संक्रमण, रक्तस्त्राव, सूज येणे अशा समस्या औषधं, गोळ्यांनी नियंत्रणात येत नसतील तरच दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे. सामान्य समस्यांसाठी दवाखान्यात शक्यतो जाऊ नये असे निर्देश WHO ने दिले आहेत.

हेही वाचा –

Corona: कोरोनाची लागण झाल्यावर सर्वात पहिल्यांदा दिसतील ‘ही’ लक्षणे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -