घरताज्या घडामोडीधक्कादायक! मलेशियात आढळला नवीन कोरोना; कोविड-१९च्या १० पट वेगाने होतोय संसर्ग

धक्कादायक! मलेशियात आढळला नवीन कोरोना; कोविड-१९च्या १० पट वेगाने होतोय संसर्ग

Subscribe

मलेशियामध्ये एका नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू कोविड-१९च्या विषाणूपेक्षा दहा पट अधिक वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे अक्षरश: कहर केला आहे. या विषाणूवर लस शोधण्यासाठी सर्वच देशात प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मलेशियामध्ये एका नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू कोविड-१९च्या विषाणूपेक्षा दहा पट अधिक वेगाने होत असल्याची माहिती समोर आली आहे. या विषाणूचे नाव डी६१४ जी (D614G) असे आहे.

तिघांमध्ये आढळून आला विषाणू

गंभीर बाब म्हणजे भारतामधून मलेशियामध्ये परतलेल्या एका हॉटेल मालकाच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही जणांमध्ये विषाणू आढळून आला आहे. यासंदर्भात ब्लुमबर्गने वृत्त दिले आहे.

- Advertisement -

दोन वेगवेगळ्या कस्टरमधील ४५ कोरोना रुग्णांपैकी तिघांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. यापैकी एका गटाला भारतामधून परतलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग झाला आहे. या व्यक्तीने १४ दिवस क्वारंटाइन होण्याच्या नियमाचे पालन केले नाही. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या व्यक्तीला पाच महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याचप्रमाणे फिलिपिन्सवरुन मलेशियामध्ये परतलेल्या काही जणांमध्येही या विषाणूचे अंश आढळून आले आहेत.

लस प्रभावी ठरणार नाही

मलेशियातील आरोग्य खात्याच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या नूर हीशाम अब्दुल्ला यांनी या नवीन विषाणूवर सध्या शोध सुरु असणारी औषधे आणि लस प्रभावी ठरणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

‘लोकांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आता मलेशियामध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला आहे’ असे अब्दुल्ला यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या नवीन विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाची साखळी मोडण्यासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्वाचे आहे’, असेही अब्दुल्ला यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – Corona Vaccine: लवकरच रशियानंतर ऑक्सफोर्डची विश्वसनीय लस तयार होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -