घरदेश-विदेशGujarat : नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Gujarat : नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…

Subscribe

गुजरात : गुजरातमधील पाटणच्या दक्षिणेस 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मोढेरा गावात मोढेरा सूर्य मंदिर बांधण्यात आले आहे. हे सूर्यमंदिर वास्तू कला आणि शिल्प कलेचे उत्तम उदाहरण आहे. नविनवर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी या मंदिरात सूर्यनमस्काराचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाचा सुर्योद्य होताच या राज्यातील लोकांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रितपणे येऊन सूर्यनमस्कार करून ही कामगिरी नोंदवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी या मोठ्या कामगिरीचे साक्षीदार बनले. त्यांनी मोढेरा सूर्य मंदिराच्या कार्यक्रमात सहभाग घेताल होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म x वर पोस्ट करत त्यांनी त्यामध्ये लिहलं आहे की, गुजरातने उल्लेखनीय कामगिरीसह नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. गुजरातमधील नागरिकांनी 108 ठिकाणी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये 108 क्रमांकाचे विशेष महत्त्व आहे. मोढेरा सूर्य मंदिरात पारपडलेल्या कार्यक्रमातमध्ये अनेक नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

सोमवारी सकाळी मोढेरा सूर्य मंदिरात सूर्यनमस्काराचा कार्यक्रम झाला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. निगीज वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक स्वप्निल डांगरीकरही येथे पोहोचले. सूर्यनमस्कार करणाऱ्या सर्वाधिक लोकांच्या रेकॉर्डची पडताळणी करण्यासाठी मी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले. हा नवा विक्रम आहे. हा विक्रम यापूर्वी कोणीही मोडण्याचा प्रयत्न केला नव्हता.

- Advertisement -

ते म्हणाले की, सर्व पुरावे तपासल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार केल्याने नवा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

त्याचवेळी राज्याच्या नावावर आणखी एक नवा विक्रम झाल्याबद्दल गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आज गुजरातमध्ये सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घालण्याचा नवा विक्रम केला आहे. 2023 मध्ये सर्वाधिक लोक एकत्र योग करण्याचा असाच विक्रम गुजरातच्या लोकांनी केला होता आणि आज पुन्हा गुजरातने विश्वविक्रम केला आहे. हा कार्यक्रम 108 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, जिथे लाखो लोकांनी एकत्रितपणे सूर्यनमस्कार केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -