घरदेश-विदेशगुवाहाटीतील बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

गुवाहाटीतील बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेत्रीला अटक

Subscribe

गुवाहाटीत बुधवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट घडवून आणला गेला होता. या हल्ल्यात ११ जण जखमी झाले होते. या हल्ल्यचा तपास गुवाहाटी पोलीस लावत असून याप्रकरणी पोलिसांनी जान्हवी साइकिया या टीव्ही अभिनेत्रीला अटक केली आहे.

गुवाहाटीतील बॉम्बस्फोटप्रकरणी एका टीव्ही अभिनेत्रीला अटक करण्यात आले आहे. या अभिनेत्री सोबत तिच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. जान्हवी साइकिया असे या अभिनेत्रीचे आणि प्रनॉमॉय राजगुरु असे तिच्या जोडीदाराचे नाव आहे. बुधवारी संध्याकाळी गुवाहाटीतील एका शॉपिंग मॉलबाहेर बॉम्हस्फोट घडवून आणला गेला होता. या हल्ल्यात ११ नागरिक गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याप्रकरणी साइकीया आणि तिचा साथीदार राजगुरुला अटक करण्यात आली आहे. या दोघांचा युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कारण त्यांच्याजवळ उल्फाशी संबंधित काही कागदपत्रे सापडली आहेत.

अभिनेत्रीच्या घरात सापडले स्फोटके

गुवाहाटी पोलिस या प्रकरणाचा तपास लावत आहे. यासंदर्भात गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले की, ‘गुवाहाटीतील बाघोरबारी येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. या घरात स्फोटक पदार्थ मिळाले. यात २० किलो गनपावडर, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, ९ एमएम पिस्तूल आणि ‘उल्फा’शी संबंधित कागदपत्रे सापडली. हे घर जान्हनी आणि राजगुरुने भाड्याने घेतले होते. राजगुरु हा १९८६ पासून ‘उल्फा’साठी काम करतो. तर जान्हवी त्याला त्या कामात मदत करते. बुधवारी झालेल्या हल्ल्यात त्या दोघांचा हात आहे. या हल्ल्यासाठी जान्हवी आणि राजगुरुने १ मे पासून हे घर भाड्याने घेतले होते. काम झाल्यानंतर ते दोघे हे घर देखील उडवणार होते. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -