घरदेश-विदेशकरुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच मिळणार डिस्चार्ज!

करुणानिधींच्या प्रकृतीत सुधारणा, लवकरच मिळणार डिस्चार्ज!

Subscribe

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. ते ९६ वर्षांचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती द्रमुक पक्षाच्या सचिवांनी दिली आहे. करुणानिधी ९६ वर्षांचे असून वयोमानानुसार त्यांची प्रकृती खालावली असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज करुणानिधींच्या भेटीसाठी चेन्नईला गेले आहेत.

दोन-तीन दिवसांत मिळणार डिस्चार्ज

द्रमुक पक्षाच्या सचिवांनी सांगितले की, ‘करुणानिधींच्या प्रकृतीत मागील आठवड्यापेक्षा आता बरीच सुधारणा झाली आहे. आपण काय बोलतोय? ते आता ते त्यांना कळत आहे. दोन-तीन दिवसांत त्यांना डिस्चार्ज मिळेल’. दरम्यान, करुणानिधींच्या आजारपणाची बातमी समोर आल्यावर द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कावेरी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. आतापर्यत दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील बऱ्याच कलावंतांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांची कावेरी रुग्णालयात भेट घेतली आहे.

- Advertisement -

करुणानिधींनी शंभरी गाठावी – एच. डी. देवगौडा

शनिवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी करुणानिधींची कावेरी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनीही शुक्रवारी रुग्णालयात जाऊन करुणानिधींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ‘आपले मित्र लवकर बरे व्हावेत, त्यांनी शंभरी गाठावी, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो’.

आतापर्यंत कुणीकुणी करुणानिधींना दिली भेट?

करुणानिधी यांची प्रकृती लवकर बरी व्हावी, म्हणून तमिळनाडूची जनता देवाकडे साकडे घालत आहे. कित्येक लोकांनी कावेरी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये द्रमुक पक्षाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येत उपस्थित आहेत. करुणानिधींच्या प्रकृतीच्या चिंतेने कित्येक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत. दरम्यान, त्यांच्या भेटीसाठी सिनेतारकांनी आणि बड्या राजकीय नेत्यांनीही कावेरी रुग्णालयात हजेरी लावली आहे. अभिनेते कमल हसन, रजनीकांत, दक्षिण भारत चित्रपट परिषदेचे अध्यक्ष अभिनेते विशाल, विनीत, तामिळनाडूचे मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी कावेरी रुग्णालयात जाऊन करुणानिधींची भेट घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -