घरमहाराष्ट्रखासदार बसले गाडीत, वर नाचले मराठा आंदोलक!

खासदार बसले गाडीत, वर नाचले मराठा आंदोलक!

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन धुळ्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संतप्त झालेल्या आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड करत त्यांच्या गाडीवर नाचल्याचे समोर आहे. या प्रकरणी १५ ते २० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. धुळ्यात सुरू असलेल्या या आंदोलनाला देखील हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले.

Hina Gavit Car Vandalized by Maratha Protesters
हिना गावित यांच्या कारवर मराठा आंदोलक नाचले

मराठा आंदोलक भाजपच्या खासदार हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड करत गाडीवर नाचले. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा प्रकार घडला आहे.

- Advertisement -

खासदार हिना गावित आज सकाळी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी आल्या होत्या. त्यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांच्या रोषाचा सामना हिना गावित यांना करावा लागला. हिना गावित गाडीत बसल्या असता संतप्त आंदोलकांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडून गाडीवर नाचले. दरम्यान हिना गावित यांना गाडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यांना काहीही दुखापत झालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी १५ ते २० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -