घरदेश-विदेशदिल्लीत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

दिल्लीत मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

Subscribe

राजधानी दिल्लीमध्ये अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून दिल्लीच्या वातावरणात बदल झाला आहे.

दिल्लीतील दक्षिण भागात आज सायंकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महिन्यातील पहिल्याच दिवशी पावसाने दिल्लीला झोडपून काढले होते. तर जुलै महिन्याच्या अखेरीस राजधानी दिल्लीला पावसाने झोडपून काढले होते. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते. पहाटेपासूनच जोरदार पावसाने सुरूवात केल्याने दिल्लीकरांचे चांगलेच हाल झाले. जवळपास तीन तास पावसाने जोरदार बँटींग केल्याने राजधानी दिल्ली जलमय झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्यावर देखील वाहतुक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

 

- Advertisement -

वाचा : मुसळधार पावासाने दिल्ली जलमय

- Advertisement -

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त 

हवामान खात्याने यापूर्वीच दिल्लीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे दिल्लीत अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. दिल्ली ट्रॅफिर पोलिसांनी ट्विट करून मुसळधार पावसाचा इशारा देत नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला होता. त्यांनी ट्विट करून त्यांनी म्हटले की, मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचले असून यामुळे वाहतुक कोंडी झाली आहे. दिल्लीतील लोनी गोल चक्कर या परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुक धिम्या गतीने सुरू आहे. त्याशिवाय प्रगती मैदान, लक्ष्मीनगर, दुर्गापुरी चौक, बिहारी कॉलनीच्या परिसरात नाला रोडवर पाणी साचले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -