घरदेश-विदेशCBI लाचखोरी प्रकरण - अस्थाना यांना सोमवारपर्यंत अटक नाही

CBI लाचखोरी प्रकरण – अस्थाना यांना सोमवारपर्यंत अटक नाही

Subscribe

देशभरातले भ्रष्टाचाराचे गुन्हे उघडकीस आणणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागावरच (सीबीआय) लाचखोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आळे आहे. राकेश अस्थाना यांनी त्यांच्याविरुद्धचा गुन्हा रद्द करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हायकोर्टाने अस्थाना यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. अस्थाना यांना २९ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी आता २९ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सीबीआयने सर्व पुरावे सुरक्षित ठेवावेत, तसेच पुढील सुनावणीपर्यंत इतर दस्तऐवज गोळा करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामध्ये मोबाइल फोन्स, लॅपटॉप आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत असे म्हटले आहे.


राकेश अस्थाना यांना पुढील सुनावणीवेळी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे उत्तर द्यावे लागणार आहे. तोपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही. सीबीआयचे विशेष संचालक व दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

काय आहे प्रकरण

अस्थाना यांच्यावर तीन कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला असून सीबीआयचे पोलीस उपअधीक्षक (डीसीपी) देवेंद्र कुमारला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याला मागील सुनावणीवेळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. देवेंद्र कुमारला १० दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती सीबीआयने दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. त्याचबरोबर राकेश अस्थाना यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राकेश अस्थाना यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अस्थाना यांना दिलासा मिळाला असून २९ ऑक्टोबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणावर २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल.

हे वाचा – आणि राज ठाकरे ढाब्यावरच थांबले जेवायला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -