घरताज्या घडामोडीKarnataka Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वाद प्रकरण पाठवले मोठ्या खंडपीठाकडे

Karnataka Hijab Row: कर्नाटक उच्च न्यायालयाने हिजाब वाद प्रकरण पाठवले मोठ्या खंडपीठाकडे

Subscribe

सलग दुसऱ्या दिवशी हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

देशातील हिजाब वाद अजूनच वाढताना दिसत आहे. हिजाब वाद प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. शाळा आणि कॉलेजमधील मुस्लिम मुलींना वर्गात हिजाब न घालण्याचा आदेश देऊ शकतात की नाही? यावर निकाल देण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे वर्ग केला आहे. म्हणजेच हिजाब वाद प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयाने मोठ्या खंडपीठाकडे पाठवले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित यांच्या खंडपीठाने शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्याच्या बंदीला आव्हान देणारी याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवली आहे.

- Advertisement -

हिजाब वाद प्रकरणाची आज सलग दुसऱ्यादिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. काल, मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत बुधवारी पुन्हा सुनावणी होईल असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब वाद प्रकरणी सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित म्हणाले की, ‘मोठ्या खंडपीठाने या प्रकरणावर विचार करणे गरजेचे आहे.’ यावेळी अधिवक्ता कलेश्वरम राज यांनी मद्रास आणि केरळ उच्च न्यायालयाने पूर्वीच्या हिजाबशी संबंधित प्रकरणाचे निकाल एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिला होता, असे निदर्शनास आणून दिले होते.

नेमका वाद काय?

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Karnataka Hijab Row: हिजाब वादाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद, भारतविरोधात मुस्लीम राष्ट्रे एकवटली


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -