घरदेश-विदेशविशिष्ट पक्षाचे काम करा असं संघ शिकवत नाही - मोहन भागवत

विशिष्ट पक्षाचे काम करा असं संघ शिकवत नाही – मोहन भागवत

Subscribe

भाजप संघाच्या तालावर नाचते असा आरोप होत असतो ही जी प्रतिमा आहे ती त्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. संघ आणि भाजप यांचे कार्य आणि कार्यपद्धतीसुद्धा वेगळी आहे, असे भागवत यांनी सांगितले.

‘हिंदूराष्ट्राचा अर्थ असा होत नाही की, या ठिकाणी मुस्लिमांना काहीच जागा नाही’ असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय परिषदेच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसंच विशिष्ट पक्षाचेच का करा असे संघाकडून स्वयंसेवकांना सांगितले जात नाही. पण देशहिताचे काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभे रहा असे संघाकडून सल्ला दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

संघ राजकारणापासून दूर

संघ सार्वभौमिक बंधुभावाच्या दिशेने काम करतो आणि या बंधुभावाचा मुलभूत सिध्दांत विविधतेमध्ये एकता हा आहे. आज जे काही चालले आहे ते धर्म नाही. ज्या दिवशी आपण म्हणू की आम्हाला मुसलमान नाही पाहिजे त्या दिवशी हिदुंत्व राहणार नाही. संघ सर्व समाजांना जोडू इच्छित आहे. राजकारणात भेदभाव होतात. जेव्हा राजकिय पक्ष तयार होतात तेव्हा विरोध सुध्दा तयार होतो. त्यामुळे आरएसएस राजकारणापासून दूर आहे. हिंदु राष्ट्राचा अर्थ असा होत नाही की, त्यामध्ये मुस्लिमांना काहीच जागा नाही. ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी हिदुत्व देखील राहणार नसल्याचे भागवतांनी सांगितले आहे.

संघाचे आणि भाजपचे कार्य वेगळे

सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ आणि भाजप यांच्यातील फरक स्पष्ट करण्यावर भर दिला. भाजप संघाच्या तालावर नाचते असा आरोप होत असतो ही जी प्रतिमा आहे ती त्यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. संघ आणि भाजप यांचे कार्य आणि कार्यपद्धतीसुद्धा वेगळी आहे, असे भागवत यांनी सांगितले. संघात जडणघडण झालेले अनेक जण भाजपमध्ये आहेत. विशिष्ट पक्षाच्या कामकाजात ‘संघ’ हा महत्त्वाची भूमिका बजावतो, असा समज पसरलेला आहे. पण तो चुकीचा आहे. ‘संघ’ हा राजकारणापासून दूर असतो. केवळ राष्ट्रहिताच्या प्रश्नांवर संघाची निश्चित मते, भूमिका असते. ती संघ मांडत राहतो.

- Advertisement -

भागवातांनी काँग्रेसची केली प्रशंसा

आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी काँग्रेसबद्दल मोठे विधान केले आहे. स्वातंत्र्य लढाईतील कॉंग्रेसच्या भूमिकेची प्रशंसा केली गेली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काँग्रेसमुळे संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन उभे राहिले. त्यावेळी काँग्रेसमध्ये सहभागी होऊन देशाच्या स्वातंत्र्याच्या योगदान देणाऱ्या महापुरुषांची प्रेरणा आजही देशातील जनतेला प्रेरित करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -