घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामोबाइल अॅडिक्शनपासून सावध करणारा बाप्पा

मोबाइल अॅडिक्शनपासून सावध करणारा बाप्पा

Subscribe

सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आहे. शेबंड्या पोरांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाचा स्मार्टफोनची चटक लागलेली आहे. मोबाइल फोनचे शरीरावर अनेक घातक परिणाम होतात. मोबाईलवर बोलताना अनेक अपघातही झालेले आहेत. लोकं आता गरजेपेक्षा अधिक मोबाइलचा वापर करु लागले आहेत. मोबाइलच्या या व्यसनापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी दत्तात्रय चिव्हने यांनी घरच्या गणपतीसाठी मोबाइल अॅडिक्शन या संकल्पनेवर देखावा तयार केला आहे. बाप्पांची मूर्ती आणि देखावा पुर्णपणे इको फ्रेंडली बनवला आहे. चित्रकलेच्या माध्यमातून अतिमोबाइल वापराचे धोके धाकवण्यात आले आहेत. हे चित्र पाहून प्रत्येक व्यक्ती मोबाइल किती वापरायचा? याचा नक्कीच विचार करेल, अशी अपेक्षा दत्तात्रय चिव्हने यांनी व्यक्त केली.

तसेच चिव्हणे यांनी गणपतीची मूर्तीही घरीच बनवली आहे. शाडूच्या मातीपासून बनवलेली ही मूर्ती अतिशय मनमोहक असून बाल गणेशाचा खेळकरपणा मूर्तीच्या माध्यमातून दाखवला आहे. बाल गणेश त्याचे वाहन मुषकाला मोदकाचे आमिष देत आहे आणि तो मोदक मिळवण्यासाठी मुषक पिरॅमिड रचतोय. गणेशाचे हे बालरुप पाहून आपल्यालाही खळखळून हसू येईल.

- Advertisement -

 


जाणून घ्या – इको फ्रेंडली बाप्पा कान्टेस्ट बद्दल

- Advertisement -

माय महानगरच्या वेबसाईटवर यासाठी एक विशेष सेक्शन तयार करण्यात आला आहे. येथे तुम्ही स्वतःचे सेल्फी अपलोड करु शकता. बाप्पांसोबतचा सेल्फी, घरगुती गणपतीसोबत कौटुंबिक फोटो, आपल्या मंडळातील गणपतीचा फोटो, आगमन आणि मिरवणुकीतीलही फोटो तुम्ही अपलोड करू शकता.



तुम्हाला हे माहिती आहे का? –
 आता बाप्पाचा प्रसादही ऑनलाइन… तोही फ्री-होम डिलीव्हरी


तसेच लालबागच्या राजाचे थेट लाईव्ह दर्शनही घेता येणार आहे. लालबागच्या राजाचे मुखदर्शन ते विसर्जन असे सर्व दहा दिवस माय महानगर वेबसाईटवर लालबागच्या राजाला तुम्ही पाहू शकता. याशिवाय गणेशोत्सवासंबंधीची प्रत्येक अपडेट, सार्वजनिक मंडळाचे उपक्रम, इको फ्रेंडली गणपती आणि उत्सवाशी निगडीत सर्व बातम्या मिळतील एका क्लिकवर…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -