घरताज्या घडामोडीमहाराष्ट्रात पवारांनी मार्केट कधीच खासगी केलेत; अमित शाहांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात पवारांनी मार्केट कधीच खासगी केलेत; अमित शाहांचा हल्लाबोल

Subscribe

कृषी कायद्यांवरुन अमित शाह यांनी शरद पवार, राहुल गांधींवर साधला निशाणा

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने आज देशभरात ठिकठिकाणी चौपाल आयोजित केले आहे. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे कसे आहेत याबद्दल भाजपचे नेते माहिती देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत किसान चौपालम्ध्ये शेतकऱ्यांना संबोधित केले. यावेळी अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रात शरद पवारांनी मापर्केट कधीच खासगी केले आहेत. आणि आता रडणे सुरु केले आहे, असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

महाराष्ट्रात शरद पवारांनी मापर्केट कधीच खासगी केले आहेत. आणि आता रडणे सुरु केले आहे. कारण देशातील जनतेने त्यांना नाकरले आहे. त्यांना जनतेने हृदयातून काढून टाकले असून नरेंद्र मोदी यांना जागा दिली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली देशभरात गोंधळ सुरु आहे. मात्र, आपले कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर भेटायला जातात तेव्हा तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना मान्य आहेत, असे अमित शाह म्हणाले. अमित शहा म्हणाले की, शेतकरी हिताबद्दल बोलणारे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या सरकारचा २०१३-१४ मध्ये केवळ २१ हजार ९०० कोटी बजेट होता, परंतु मोदी सरकारने १.३४ लाख कोटी बजेट केले. ते आमच्याकडे माहिती विचारत आहेत. उल्टा चोर कोतवाल को डाँटे असे चित्र झाले आहे. एमएसपी बंद होणार नाही, विरोधक खोटे बोलत आहेत, असे अमित शहा म्हणाले.

- Advertisement -

अमित शहा म्हणाले की, आज देशासाठी महत्वाचा दिवस आहे, आज अटलबिहारी वाजपेयी, मदन मोहन मालवीय यांची जयंती आहे ज्यांनी देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अमित शहा म्हणाले की दहा वर्षांपासून यूपीए सरकारने शेतक्यांचे केवळ ६० हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. पण अवघ्या अडीच वर्षात मोदी सरकारने दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ९५ हजार कोटी टाकले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -