घरदेश-विदेशचिंता वाढली! 'या' देशात आढळला कोरोना व्हायरसचा तिसरा स्ट्रेन

चिंता वाढली! ‘या’ देशात आढळला कोरोना व्हायरसचा तिसरा स्ट्रेन

Subscribe

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा हा नवा स्ट्रेन वेगळा असून या स्ट्रेनबाबतचा अधिक तपास सुरू

ब्रिटनसह दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर देशभरातील सर्वच नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्यानंतर आता आणखी एका देशात कोरोनाचा नवीन स्ट्रेन आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा नवा तिसरा स्ट्रेन नायजेरियातील नागरिकांमध्ये आढळून आला आहे. तर आफ्रिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या स्ट्रेनसंदर्भातील अधिक माहिती घेण्यासाठी शास्त्रज्ञांची टीम यावर संशोधन करत आहे. दरम्यान बुधवारी ब्रिटनमध्ये दक्षिण आफ्रिकेमधून परतलेल्या दोन प्रवाशांमध्ये कोरोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळून आला आहे.

ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा हा नवा स्ट्रेन वेगळा असून या स्ट्रेनबाबतचा अधिक तपास नायजेरिया सीडीसी आणि आफ्रिकन सेंटर ऑफ एक्सीलेंस फॉर जीनोमिक्स ऑफ इंफेक्शियस डिजीजचे शास्त्रज्ञ करत असल्याची माहिती आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनचे प्रमुख डॉ. जॉन नेकेंगसाँग दिली.

- Advertisement -

असे आहे तिसऱ्या नव्या स्ट्रेनचे नाव

समोर आलेल्या एका अहवालानुसार, नायजेरियातून आढळलेल्या स्ट्रेनचा प्रभाव किती आहे, अद्याप हे स्पष्ट झाले नाही. ३ ऑगस्ट आणि ९ ऑक्टोबर दरम्यान दक्षिणी ओसून राज्यातील लागोसच्या उत्तरेपासून १०० मैल अंतरावर तपासणी करण्यात आलेल्या दोन रुग्णांच्या नमुन्यात कोरोना विषाणूचा हा नायजेरियन स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाच्या या नायजेरियन स्ट्रेनला P681H असे नाव देण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे.


कोरोनाच्या लक्षणातही राहिला ऑनड्युटी, सुपर स्प्रेडरने घेतला ७ जणांचा जीव, तर ३०० जण क्वारंटाईन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -