घरदेश-विदेशअम्फान वादळाचा मुक्काम बुधवारपर्यंत; होणार सुपर सायक्लॉनमध्ये रुपांतर

अम्फान वादळाचा मुक्काम बुधवारपर्यंत; होणार सुपर सायक्लॉनमध्ये रुपांतर

Subscribe

सुपर सायक्लॉन म्हणून रूपांतरीत होण्याची शक्यता असलेल्या अम्फान या चक्रीवादळाचा मुक्काम भारतात बुधवारपर्यंत असेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. बुधवारनंतर या वादळाची तीव्रता कमी होईल. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर वादळाचा राहणारा प्रभाव कमी होण्यासाठी मदत होईल. पश्चिम बंगालच्या दिघा आणि बांगलादेश येथील हातिया याठिकाणी चक्री वादळाचा तडाखा बसणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

ओडिशा – पश्चिम बंगालला धोका 

‘अम्फान’ चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशाने या चक्रीवादळाचा फटका ज्यांना बसू शकतो, अशा ११ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी भारतीय हवामान खात्याच्या एका अहवालानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ‘अम्फान’ तीव्र बनू लागले आहे आणि येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. “चक्रीवादळाचा मार्ग प्रामुख्याने पश्चिम बंगाल, सागर बेटे आणि कदाचित बांगलादेशकडे आहे. परंतु यावर आम्ही बारीक लक्ष ठेवले आहे.” एनडीआरएफने आपली टीम वेळेत तैनात केली आहे. चक्रीवादळाच्या वादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या अनेक किनारपट्टी जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

CRPFच्या दहा तुकड्या राज्यात दाखल – अनिल देशमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -