घरताज्या घडामोडीखेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या जागी 'सेक्स डॉल्स'

खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी प्रेक्षकांच्या जागी ‘सेक्स डॉल्स’

Subscribe

लॉकडाऊन असल्यामुळे प्रेक्षक मैदानात येऊ शकत नाही. त्यामुळे दक्षिण कोरियात फुटबॉल क्लब 'एफसी सोल'ने अनोखा तोडगा काढला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता भारतासह इतर काही देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका जगभरातील अनेक क्रिडा स्पर्धांना देखील बसला आहे. त्यामुळे अनेक क्रिडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, सामाजिक अंतर पाळत या स्पर्धा प्रेक्षकांविना सुरु होताना दिसत आहेत. मात्र, खेळाडूंचे मनोधैर्य आणि उत्साह वाढण्यासाठी, याकरता मैदानात प्रेक्षकांच्या जागी ‘सेक्स डॉल्स’ ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे दक्षिण कोरियातील ‘एफसी सोल’ नावाचा फुटबॉल क्लब अडचणीत आला आहे.

- Advertisement -

प्रेक्षकांच्या रांगेत प्लॅस्टिकच्या बाहुल्या

लॉकडाऊन असल्यामुळे प्रेक्षक मैदानात येऊ शकत नाही. त्यामुळे दक्षिण कोरियात फुटबॉल क्लब ‘एफसी सोल’ने अनोखा तोडगा काढला आहे. दक्षिण कोरियात फुटबॉल लीगच्या लढती सुरु झाल्या असून मैदानात प्रेक्षकांना परवानगी नसल्यामुळे प्लॅस्टिकच्या बाहुल्या प्रेक्षकांच्या रांगेत बसवण्यात आल्या आहेत. दरम्यान, लढतीचे लाईव्ह स्रीमिंग करण्यात आले. त्यावेळी प्रेक्षकात ठेवलेल्या बाहुल्या नाही तर सेक्स डॉल्स असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

सेक्स वेबसाईटची माहिती

या प्लॅस्टिक बाहुल्यांच्या हातात सेक्स वेबसाईटची माहिती देणारे फलक असल्याचे समोर आले. त्यामुळे क्लबवर प्रचंड टीका करण्यात आली आहे. दरम्यान, या सेक्स डॉल्स नसून दुकानात ठेवले जातात ते पुतळे ‘प्रिमियम मॅनक्वीन्स’ असल्याचे क्लबने सांगितले आहे. मात्र, यावर अनेकांनी टीका केल्यानंतर हे प्रकरण वाढल्याने क्लबने माफी मागितली आहे. तसेच क्लबने यासाठी बाहुल्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीला जबाबदार धरले आहे.


हेही वाचा – ‘दिल्लीत खासगी कार्यालयं आणि बाजारपेठा उघडण्यास संमती’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -