घरदेश-विदेशमला जे योग्य वाटलं ते मी केलं - राजनाथ सिंह

मला जे योग्य वाटलं ते मी केलं – राजनाथ सिंह

Subscribe

राफेल विमानाची पुजा करताना सिंह यांनी विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे देशाच्या संरक्षण मंत्रींकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात होती. यावर आता अखेर राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसऱ्याच्या दिवशी राफेल विमानाच्या केलेल्या पुजेवरुन त्यांना नेटीझन्सने प्रचंड ट्रोल केलं. राफेल विमानाची पुजा करताना सिंह यांनी विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले होते. त्यामुळे देशाच्या संरक्षण मंत्रींकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात होती. यावर आता अखेर राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मला जे योग्य वाटलं ते मी केलं’, असं राजनाथ सिंह म्हणाले. त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून लिंबू प्रकरणावर मौन सोडलं.

हेही वाचा – जितेंद्र आव्हाड यांची मिश्किल टीका; म्हणे, ‘पीएमसी बँकेबाहेर लिंबू लावा’

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले राजनाथ सिंह?

‘माझी श्रद्धा आहे. या सृष्टीत कुठली ना कुठली एक सुपरपॉवर आहे. लहानपणापासून मी तसं मानत आलो आहे. त्या विश्वासातून मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मग त्याबद्दल कुणालाही काहाही वाटो’, असे राजनाथ सिंह म्हणाले. राफेल प्रकरण भारतीय राजकारणात प्रचंड गाजलं. याच विमानाच्या कागपत्रावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार ही चोर है’ अशा शब्दात टीका केली होती. मोठ्या राजकीय वादंगानंतर अखेर फ्रान्सकडून रविवारी पहिलं राफेल विमान देण्यात आलं. हे विमान दसऱ्याच्या मुहूर्तावर देण्यात आलं. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर फ्रान्समध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राजनाथ सिंह उपस्थित होते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. राफेल त्याच दिवशी मिळाल्यामुळे सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केली. यावेळी त्यांनी विमानाच्या चाकाखाली लिंबू ठेवले होते. मात्र, यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं गेलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -