घरटेक-वेक'या' तारखेपर्यंत असणार 'जिओ'ची फ्री कॉलिंगची सुविधा

‘या’ तारखेपर्यंत असणार ‘जिओ’ची फ्री कॉलिंगची सुविधा

Subscribe

जिओने त्याची कॉलिंग पॉलिसी बदलल्याने जिओ ग्राहकांना आता जिओ व्यतिरिक्त इतर ग्राहकांनाकॉल करण्यासाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारला जाणार आहे. यापुर्वी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. या घोषणेनंतर फ्री कॉलिंगची सुविधा कधीपर्यंत असणार असा प्रश्न अनेक ग्राहकांनी विचारल्यानंतर जिओने यावर उत्तर दिले आहे. जिओ कॉलिंगचे नवे शुल्क आकारणी १० ऑक्टोबरनंतर लागू करण्यात येईल, अशी माहिती याआधी जिओने आपल्या युजर्सना दिली होती. मात्र आता यासंदर्भातील एक नवं ट्वीट करत जिओने नवीन माहिती दिली आहे.

- Advertisement -

९ ऑक्टोबर किंवा त्याधी कोणताही प्लॅनसाठी जिओ नंबरवर रिचार्ज केला असल्यास तो प्लॅन संपेपर्यंत जिओ व्यतिरिक्त अन्य नेटवर्कवर देखील फ्री कॉलिंगची सुविधा युजर्सना मिळणार ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती जिओने ट्विट करत दिली आहे.


हेही वाचा- वोडाफोन-आयडिया फ्री कॉलिंग; जिओला फटका

त्यामुळेच जिओ ग्राहकांना जिओ प्लॅनची व्हॅलिडीटी चेक करावी लागणार आहे. ती संपल्यानंतर वेगळा IUC टॉप-अप रिचार्ज करावा लागेल. जिओने १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत Top Up vouchers उपलब्ध केले आहेत. १० रुपयांच्या प्लॅनवर १ जीबी आणि १०० रुपयाच्या रिचार्जवर १० जीबी अ‍ॅडिशनल डेटा युजर्सना मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -