घरदेश-विदेशमुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरी आयकर विभागाचे छापे

मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सचिवाच्या घरी आयकर विभागाचे छापे

Subscribe

मुख्यमंत्री कमलनाल यांचे स्वीय सचिव प्रविण कक्कड यांच्या घरावर रात्री ३ वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाने छापा मारला आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वीय सचिव प्रवीण कक्कड यांच्या घरावर काल, शनिवारी रात्री ३ वाजता आयकर विभागाने छापा टाकला. प्रवीण कक्कड यांच्या इंदोर येथील निवासस्थानावर दिल्लीवरुन आलेल्या आयकर विभागाच्या १५ हून अधीक अधिकाऱ्यांच्या टीमने हा छापा टाकला आहे. दिल्लीतील आयकर विभागाच्या माहितीनूसार एकाच वेळी ५० ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये मध्य प्रदेश, दिल्ली तसेच गोव्याचा समावेश आहे. सचिव प्रविण कक्कड यांच्या सोबतच मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे रतुल पुरी, अमीरा ग्रुप, आणि मोजर बेयर येथे छापे टाकण्यात आले आहेत.

- Advertisement -

कारवाई दरम्यान, भोपाल येथील प्रतिक जोशी यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत ९ करोड रुपयांची रोकड मिळाली आहे. सदर मालमत्ता प्रविण कक्क्ड यांच्याशी संबंधीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे इंदोरच्या उषा नगर येथील त्यांच्या सीएच्या घरावर देखील आयकर विभागाने छापा मारला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कमलनाथ यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या आर के मिगलानी यांच्या घरावर देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. ५० ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाच्या ३०० अधिकाऱ्यांची टिप तपास करत आहे.

कोण आहेत प्रविण कक्कड 

मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री कमलान यांचे सचिव असलेले प्रविण कक्कड हे माझी पोलीस अधिकारी आहेत. २००४ साली त्यांनी पोलिसाच्या नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर ते काँग्रेस नेते कांतिलाल भूरिया यांचे सचिव बनले. यानंतर २०१८ साली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनलेल्या कमलनाथ यांचे ते स्वीय सचिव झाले. आतापर्यंत समोर आलेल्या माहिती नुसार पोलीस सेवेत असताना त्यांची अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यांच्यावर अद्याप चौकशी सुरु आहे.

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -