घरमहाराष्ट्रदेवेन भारती यांची तातडीने बदली करा; निवडणूक आयोगाचे आदेश

देवेन भारती यांची तातडीने बदली करा; निवडणूक आयोगाचे आदेश

Subscribe

मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

मुंबईचे सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांची बदली करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना दिले आहेत. मुंबई पोलीस दलातील महत्वाचे मानले जाणारे कायदा व सुव्यवस्था हे पद आहे. या पदावर देवेन भारती हे गेल्या चार वर्षांपासून तग धरून बसले होते. निवडणुकीच्या काळात भारती यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतू अचानक त्यांच्या बदलीमुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाने भारती यांच्या बदलीचे आदेश दिले असून लवकरात लवकर यांच्या जागी अधिकारी नेमण्यात यावा, असेही आयोगाने आदेश दिले आहेत. भारती यांच्या जागी (कायदा सुव्यवस्था) सह आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे आणि नवल बजाज यांचे नाव पुढे येत आहे. मात्र दोघांपैकी डुंबरे यांची नेमणूक होण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय देवेन भारती 

साधारणतः दर ३ वर्षानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात. काही प्रकरणात तर सरकार वर्षभराच्या आतच अधिकाऱ्याची उचलबांगडी करतात. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून बदल्यांना सुरुवात केली आहे. मात्र देवेन भारती यांच्या बदलीचे काहीही चिन्ह दिसत नव्हते. देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे कारदा व सुव्यवस्था सारख्या महत्त्वाच्या खात्यावर गेली ४ वर्षांहून अधिक काळ ते कार्यरत आहेत. मात्र आता त्यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगाने भाजप सरकारला सणसणीत चपराक दिली आहे, असेच म्हणावे लागेल. निवडणूक आयोगाने मुख्य सचिव यु. पी. एस. मदान यांना दिलेल्या आदेशानुसार आज, रविवार दुपारी १ वाजेपर्यंत देवेन भारती यांच्या बदलीचा निर्णय सांगायचा आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीची दखल 

निवडणूक आयोगाने कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा आणि बिधाननगरचे पोलीस आयुक्त ज्ञानवंत सिंग या दोन आयपीएस अधिकाऱ्याच्या ५ एप्रिल रोजी बदल्या केल्या आहे. या बदलीला आक्षेप घेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात आमच्या राज्यातील आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्या का होत आहेत, इतर राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे बॅनर्जी यांनी केलेल्या पत्रव्यवहारात नमूद करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या राज्यातील काही सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले असून यामध्ये मुंबईचे (कायदा व सुव्यवस्थे) चे सहआयुक्त देवेन भारती यांचेदेखील नाव आहे.

मात्र तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तची गोची

देवेन भारती यांना मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख होण्याची इच्छा असताना त्यांच्यावर मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेची जवाबदारी देण्यात आली होती. या जबाबदारीवर खरे उतरलेल्या देवेन भारती यांच्यामुळे मात्र तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्तची गोची होत होती. मात्र मुंबई पोलीस आयुक्त पदाचा भार संजय बर्वे यांच्याकडे सोपवण्यात आल्यांनंतर भारती यांचे मुंबई पोलीस दलातील वजन काहीसे कमी झाले होते. त्यामुळे भारती यांची मुंबई पोलीस दलात काम करण्याची इच्छा उरलेली नव्हती असे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -