घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना रुग्णांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर

कोरोना रुग्णांच्या यादीत भारत दहाव्या क्रमांकावर

Subscribe

मागच्या २४ तासांत भारतात ७ हजार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक स्तरावर कोविड रुग्णसंख्येचा तक्ता पाहिल्यास भारत इराणला मागे टाकत दहाव्या क्रमाकांचा सर्वाधिक रुग्ण असणारा देश ठरला आहे. रविवारी देशात आतापर्यंतचे सर्वाधिक ६,९७७ रुग्ण आढळून आले. आता भारतातील रुग्णसंख्या १ लाख ३८ हजार ५२६ वर पोहोचली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. तसेच भारतातली मृत्यूंची संख्या आता चार हजाराच्या पुढे गेली आहे.

जागतिक आकडेवारी पाहीली तर सर्वाधिक रुग्णसंख्येत अमेरिका, रशिया, स्पेन, ब्राझील, इंग्लंड, इटली, फ्रान्स, जर्मनी, तुर्कस्थान आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागत आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या आकडेवारीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -
World Corona Cases
जागतिक कोरोना आकडेवारी

रविवारी वाढेलली रुग्णसंख्या पाहिली तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचे दिसून येते. मागच्या २४ तासांत महाराष्ट्रात ३०४१ रुग्ण आढळले. ज्यामध्ये एकट्या मुंबईतील १,७२५ रुग्ण होते. यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ही ५० हजारांच्या वर तर मुंबईतील रुग्णसंख्या ३० हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

पश्चिम बंगालमध्येही आता रुग्णसंख्या वाढत आहे. रविवारी येते २०८ रुग्ण आढळले. प.बंगालमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ३,६६७ वर पोहोचली आहे. तामिळनाडू राज्यात देखील रविवारी ७६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. चेन्नईतील एकूण रुग्णसंख्या १० हजारांच्या वर पोहोचली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र आणि तामिळनाडू नंतर सर्वाधिक फटका गुजरात राज्याला बसलेला आहे. गुजरातमध्ये १४ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. रविवारी गुजरातमध्ये २९ मृत्यू झाले आहेत. ज्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८५८ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक मृत्यू होणारे गुजरात हे दुसरे राज्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -