घरदेश-विदेशIndia Canada Row : कोणत्याही तपासाची तयारी, पण आधी पुरावा द्या; भारताने...

India Canada Row : कोणत्याही तपासाची तयारी, पण आधी पुरावा द्या; भारताने कॅनडाला सुनावले

Subscribe

लंडन : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबत आक्रमक भूमिका घेत भारताने कॅनडाची पुन्हा एकदा कानउघाडणी केली आहे. भारताने कोणत्याही तपासाला नकार दिलेला नाही. आम्ही केवळ हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय सरकारी एजंटच्या सहभागाबाबत पुरावे मागत आहोत, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – शामीच्या ‘त्या’ गुन्ह्यासाठी दिल्ली पोलिसांनी केलं ट्वीट; मुंबई पोलिसांनीही दिलं सडेतोड उत्तर

- Advertisement -

केंद्रीय मंत्री जयशंकर पाच दिवसांच्या लंडनदौऱ्यावर होते. ज्येष्ठ पत्रकार लिओनेल बार्बर यांच्यासोबत ‘How a Billion People See the World’ या कार्यक्रमात जयशंकर यांनी भारताची ही भूमिका मांडली. खलिस्तानी अतिरेकी आणि टायगर फोर्सचा प्रमुख निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडातील संबंध ताणले गेले आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी बोलावण्याबरोबरच उभय देशांतील आपापल्या नागरिकांसाठी Advisory देखील जारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जयंशकर यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे.

- Advertisement -

तुमच्याकडे असा आरोप करण्याजोगे काही कारण असेल तर कृपया त्याबाबतचे पुरावे शेअर करा. आमची याबाबतच्या तपासास बिल्कुल ना नाही…,” असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कॅनडाने आपल्या आरोपाची पुष्टी करणारे कोणतेही पुरावे भारतासोबत शेअर केलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

गेल्या जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कॅनडाच्या सरकारने हरदीपसिंगच्या हत्येचा आरोप भारतावर लावला होता. कॅनडाच्या भूमीवर एका नागरिकाच्या हत्येमध्ये परदेशी सरकारचा सहभाग असून हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. या हत्येच्या तपासात सहकार्य मिळविण्यासाठी आम्ही भारत सरकारवर दबाव आणू, असे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यापूर्वी कॅनडाच्या संसदेला संबोधित करताना म्हटले होते. पण भारत सरकारने कॅनडाचे सर्व आरोप त्याचवेळी फेटाळून लावले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -