घरदेश-विदेशतैवानबाबत राजकारण करणं चुकीचं; केंद्र सरकारला काँग्रेसच्या 'या' नेत्याचा पाठिंबा

तैवानबाबत राजकारण करणं चुकीचं; केंद्र सरकारला काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा पाठिंबा

Subscribe

भारत आणि चीन सैनिकांमध्ये 9 डिसेंबरला सीमेवर झालेल्या चकमकीवरून काँग्रेस आणि सत्तारुढ भाजपमध्ये राजकारण सुरु झालं आहे. यात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या चकमकीवर भाष्य करताना काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप केले. यात आता काँग्रेस नेते अनिल अँटोनी यांनी भारतीय सैनिकांच्या प्रयत्नांचे कौतुक करत म्हटले की, सीमेवरील चकमकीचे राजकारण केले जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अमित शाहांच्या विधानास त्यांनी अप्रत्यक्षरित्या समर्थन दिले आहे.

अँटनी म्हणाले की, आपल्या सशस्त्र दलांना राजकीय संस्था आणि जनतेने जास्तीत जास्त पाठिंबा दिला पाहिजे. या मुद्द्यावर राजकारण होता कामा नये, कारण हा गंभीर मुद्दा आहे. G-20 मध्ये पंतप्रधान मोदींनी त्यांचे चीनी समकक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर हे घडले. यापूर्वी 2019 मध्येही असेच घडले होते. हा एक पॅटर्न आहे. याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

- Advertisement -

माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल यांनी ट्विट करत म्हटले की, पूर्व लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावाच्या दक्षिणेकडील मानवरहित उंचावर कब्जा करण्याचा पीएलएचा प्रयत्न हाणून पाडल्याबद्दल आम्हाला आमच्या सैनिकांचा अभिमान आहे. त्याला या मुद्द्याचे राजकारण न करता जास्तीत जास्त पाठिंबा देण्याची गरज आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या मुद्द्यावर ‘स्पष्टता’ मागितल्याच्या पार्श्वभूमीवर अनिल अँटनी यांची टिप्पणी आली. ते म्हणाले, ‘आमच्या भारतीय लष्कराच्या जवानांना पुन्हा चिनी लोकांनी भडकावले आहे. आमचे जवान शौर्याने लढले आणि त्यातील काही जखमीही झाले.

- Advertisement -

अँटनी म्हणाले, ‘आम्ही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देशासोबत आहोत आणि त्यावर राजकारण करायला आवडणार नाही, पण मोदी सरकारने एप्रिल 2020 पासून चीनच्या उल्लंघनाबाबत आणि एलएसीवरील सर्व ठिकाणी उभारणीबाबत प्रामाणिक असले पाहिजे. सरकारने या विषयावर संसदेत चर्चा करून देशाला विश्वासात घेण्याची गरज आहे. आमच्या सैनिकांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू, असे खरगे यांनी ट्विट केले.


नागपूरचे अधिवेशन किमान तीन आठवडे करा; अजित पवार यांची मागणी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -